घरक्रीडाब्लास्टर्स-ओदीशा यांच्यात गोलशून्य बरोबरी

ब्लास्टर्स-ओदीशा यांच्यात गोलशून्य बरोबरी

Subscribe

हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) सहाव्या मोसमात केरला ब्लास्टर्स एफसी आणि ओदीशा एफसी यांच्यातील नीरस लढतीत गोलशून्य बरोबरी झाली. नेहरू स्टेडियमवरील निकाल ब्लास्टर्सकरीता जास्त निराशाजनक ठरला.

ओदीशाची 4 सामन्यांतील ही पहिलीच बरोबरी असून एक विजय व दोन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे चार गुण झाले. ब्लास्टर्सची कामगिरी सुद्धा अशीच आहे. या दोन्ही संघांनी मुंबईला मागे टाकले. तिन्ही संघांचे चार गुण आहेत. यात ओदीशाचा गोलफरक 0 (6-6), ब्लास्टर्सचा उणे 1 (3-4), तर मुंबईचा उणे 3 (5-8) आहे. ओदीशाचा पाचवा, ब्लास्टर्सचा सहावा, तर मुंबईचा सातवा क्रमांक आहे.

- Advertisement -

खेळाडू जायबंदी होण्याचे प्रकारही सामन्यातील चुरस कमी होण्यास कारणीभूत ठरले. दुसर्‍याच मिनिटाला ब्लास्टर्सला दुखापतीचा धक्का बसला. कर्णधार जैरो रॉड्रीग्जला मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे मैदान सोडावे लागले. त्याच्याऐवजी अब्दुल हक्कू याला पाचारण करण्यात आले.

सहाव्या मिनिटाला ओदीशाने प्रयत्न केला. मध्य फळीतील डियावँडौ डियाग्ने याने डावीकडून मिळालेल्या चेंडूसाठी झेप घेत हेडिंग केले, पण चेंडू बाहेर गेला.

- Advertisement -

नवव्या मिनिटाला ओदीशाचा गोलरक्षक फ्रान्सिस्को डोरोन्सोरो याने चेंडूवर ताबा मिळविण्यात ढिलाई केली. त्याचवेळी ब्लास्टर्सने त्याने मारलेला चेंडू थोपविला. त्यात शुभम सारंगीने सर्जिओ सिदोंचाला पाडले. त्यामुळे ब्लास्टर्सला फ्री किक मिळाली, पण ओदीशाने ती रोखली.

ओदीशाच्या बचाव फळीतील राणा घरामी आणि नाराण दास यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. समदने दोघांमधून चेंडू मारत ड्रिबलिंग केले, पण नारायणने त्याला पेनल्टी क्षेत्रात पाडले. त्यामुळे समदने पेनल्टीचे अपील केले, पण पंचांनी ते फेटाळून लावले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -