Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर IPL 2020 IND vs AUS : कोहली नसला तरी ऑस्ट्रेलिया जिंकणारच असे नाही - लायन

IND vs AUS : कोहली नसला तरी ऑस्ट्रेलिया जिंकणारच असे नाही – लायन

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. 

Related Story

- Advertisement -

विराट कोहली तीन कसोटी सामन्यांना मुकणार असला तरी ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर चषक जिंकेलच हे निश्चित नाही, असे मत ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फिरकीपटू नेथन लायनने व्यक्त केले. भारतीय संघ लवकरच ऑस्ट्रेलियात तीन एकदिवसीय, तीन टी-२० आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतील सर्व सामने खेळणार आहे. मात्र, कसोटी मालिकेतील अखेरच्या तीन सामन्यांत तो खेळणार नाही. कोहली पितृत्व रजेवर जाणार असून पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. त्यामुळे त्याची उणीव भारताला नक्कीच भासेल, असे लायनला वाटते.

विराट कोहली तीन सामन्यांना मुकणे ही कसोटी मालिकेसाठी निराशाजनक गोष्ट आहे. तुम्हाला सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळायचे असते. माझ्या मते, सध्याच्या घडीला स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लबूशेन यांच्यासह कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. भारतीय संघाला कोहलीची नक्कीच उणीव भासेल, पण त्यांच्याकडे चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे असे इतरही उत्कृष्ट खेळाडू आहेत हे विसरून चालणार नाही, असे लायन म्हणाला.

- Advertisement -

कोहली भारतीय संघात नसल्याने ऑस्ट्रेलिया ही मालिका जिंकणारच हे निश्चित नाही. भारताकडे अनुभवी आणि युवा खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे. त्यामुळे आम्हाला मालिका जिंकण्यासाठी बरीच मेहनत करावी लागले. तसेच आम्हाला भारतीय खेळाडूंच्या जमेच्या बाजू आणि कमकुवत बाजू यांचा अभ्यास करावा लागेल, असेही लायनने सांगितले. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून पहिल्या कसोटीला १७ डिसेंबरपासून सुरुवात होईल. अॅडलेड येथे होणारी ही कसोटी प्रकाशझोतात (डे-नाईट) खेळली जाईल.

- Advertisement -