घरक्रीडाकोहलीच्या नेतृत्वात आरसीबी संघाकडून खेळण्यास उत्सुक - फिंच 

कोहलीच्या नेतृत्वात आरसीबी संघाकडून खेळण्यास उत्सुक – फिंच 

Subscribe

कोहली किती जिद्दी आहे, हे मी पाहिले आहे, असे अॅरॉन फिंच म्हणाला.

विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाकडून आयपीएलमध्ये खेळण्यास मी खूप उत्सुक आहे, असे विधान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने केले. यंदाच्या आयपीएलमध्ये फिंच आरसीबीचे प्रतिनिधित्व करणार आहे. आरसीबीच्या संघात फिंच आणि कोहलीसह डिव्हिलियर्स, डेल स्टेन, क्रिस मॉरिस, युजवेंद्र चहल असे अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे आरसीबीला पहिल्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावण्याची उत्तम संधी आहे, असे फिंचला वाटते. यंदाचे आयपीएल १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत दुबईमध्ये होणार आहे.

बरीच वर्षे कोहलीविरुद्ध खेळलो

मी आरसीबी संघाकडून खेळण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. या संघात जगातील काही सर्वोत्तम खेळाडू आहेत आणि त्यांच्यासोबत खेळताना नक्कीच खूप मजा येईल. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आमच्या चाहत्यांसमोर खेळायला मला आवडले असते. मात्र, यंदा ते शक्य होणार नाही. परंतु, आता युएईमध्ये आरसीबीचे प्रतिनिधित्व करण्याची मी वाट पाहतो आहे. मला पहिल्यांदाच कोहलीच्या नेतृत्वात खेळण्याची संधी मिळणार आहे आणि यासाठी मी खूप उत्सुक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये मी बरीच वर्षे कोहलीविरुद्ध खेळलो आहे. त्यामुळे तो किती जिद्दी आहे आणि प्रत्येक सामना जिंकण्याचा तो कसा प्रयत्न करतो, हे मी पाहिले आहे. आता मला हे जवळून अनुभवता येईल, असे फिंच म्हणाला.

- Advertisement -

कोहलीला मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न 

तू मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करतोस. तुझ्या या अनुभवाचा कोहलीला फायदा होईल का असे विचारले असता फिंच म्हणाला की, कर्णधार म्हणून माझा अनुभव संघासाठी फायदेशीर ठरेल अशी मला आशा आहे. माझ्यामुळे कोहलीवरील दबाव थोडा कमी झाला तर मला आनंदच होईल. मी त्याला मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -