घरक्रीडाIND vs AUS : 'बॉक्सिंग डे' कसोटीत प्रेक्षकांना परवानगी?

IND vs AUS : ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत प्रेक्षकांना परवानगी?

Subscribe

मेलबर्नमध्ये लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणण्यात आली आहे.   

भारतीय क्रिकेट संघाच्या यावर्षाअखेरीस होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत बरीच चर्चा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, हा दौरा होण्याबाबत साशंकता होती. मात्र, आता न्यू साऊथ वेल्स सरकारने भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यावर क्वारंटाईनमध्ये असताना सराव करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यातच आता मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) होणाऱ्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत प्रेक्षकांना प्रवेश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लॉकडाऊनचे नियम शिथिल

मेलबर्न हे ऑस्ट्रेलियातील दुसरे सर्वात मोठे शहर असून गेल्या काही महिन्यांत तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला होता. त्यामुळे बराच काळ मेलबर्नमध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, आता मेलबर्नमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून सोमवारी लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याबाबतची घोषणा झाली. त्यामुळे आता क्रिकेटचे सामने स्टेडियममध्ये जाऊन पाहण्यासाठी चाहत्यांना परवानगी मिळू शकेल.

- Advertisement -

प्रेक्षक लाभणार हे निश्चित

‘बॉक्सिंग डे कसोटीला अजून वेळ आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणारा हा सामना प्रेक्षकांसह होईल याची मला खात्री आहे. आता किती प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार हे सांगणे अवघड असले, तरी सामन्याला प्रेक्षक लाभणार हे निश्चित आहे. आम्ही याबाबत अजून चर्चा करत आहोत,’ असे व्हिक्टोरिया राज्य सरकारचे प्रमुख डॅनियल अँड्र्यूज म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -