घरक्रीडाऑलिम्पिक रद्द होण्याची भीती!

ऑलिम्पिक रद्द होण्याची भीती!

Subscribe

मीराबाई चानूचे विधान

करोनाच्या पार्श्वभूमीवर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात येऊ शकेल किंवा रद्द होऊ शकेल. भारतामध्ये करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३०० पार गेली असून जगभरात आतापर्यंत १३ हजारहून अधिक करोनाचे रुग्ण आढळले आहेत. मात्र, ऑलिम्पिक स्पर्धा रद्द झाली तर मागील चार वर्षे खेळाडूंनी केलेली मेहनत वाया जाईल, असे भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानूला वाटते.

ऑलिम्पिक स्पर्धा झाली नाही, तर आम्ही मागील चार वर्षे केलेली मेहनत वाया जाईल. ही स्पर्धा रद्द होणार नाही अशी मला आशा आहे आणि यासाठी मी रोज देवाकडे प्रार्थना करत आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणे हे माझे स्वप्न आहे. ही स्पर्धा रद्द होण्याची भीती आहे. त्यामुळे मी सध्या फक्त ऑलिम्पिक होण्याबद्दलच विचार करत आहे. विश्रांती, सराव याची मला चिंता नाही. ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली तरीही आमच्या तयारीवर बराच परिणाम होईल, असे मीराबाई म्हणाली. मीराबाई मागील ऑलिम्पिकमध्ये खेळली होती. मात्र, क्लिन आणि जर्कच्या तिन्ही प्रयत्नांत तिला वजन उचलण्यात अपयश आल्याने तिचे पदक मिळवण्याचे स्वप्न अधुरे राहिले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -