घरक्रीडास्पेन, पोर्तुगालचे सामने अनिर्णित राहिले तरीही बाद फेरीत प्रवेश

स्पेन, पोर्तुगालचे सामने अनिर्णित राहिले तरीही बाद फेरीत प्रवेश

Subscribe

स्पेन आणि पोर्तुगाल यांनी आधीच्या मॅचसमध्ये मिळवलेल्या गुणांच्या जोरावर बाद फेरीत स्थान मिळवले आहे. बी गटात स्पेन पहिल्या तर पोर्तुगाल दुसऱ्या स्थानावर आहे

फिफा विश्वचषकाची बाद फेरी जसजशी जवळ येतेय तशी सर्वच सामन्यातील चुरस वाढत चालली आहे. काल बी गटातील स्पेन आणि पोर्तुगाल या संघाचे सामने अनुक्रमे मोराक्को आणि इराण यांच्यासोबत बरोबरीत सुटले. तरी देखील त्यांनी या आधीच्या मॅचसमध्ये मिळवलेल्या गुणांच्या जोरावर बाद फेरीत स्थान मिळवले आहे. मोरोक्कोविरूद्ध स्पेन सामना २-२ तर पोर्तुगालविरूद्ध इराण सामना १-१ च्या बरोबरीत सुटला.

मोरोक्को आणि स्पेन यांच्यातील सामना सुरूवातीपासूनच चुरशीचा चालला होता. सामन्याच्या १४ व्या मिनिटाला स्पेनचे अनुभवी खेळाडू आंद्रेस इनिएस्ता आणि सर्गियो रामोस यांच्यात ताळमेळाच्या झालेल्या चुकीचा फायदा घेत मोरक्कोच्या बोतेबने गोल केला. या वर्षीच्या विश्वचषकातील मोरोक्कोचा हा पहिलाच गोल होता. मात्र मोरोक्कोचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. १९ व्या मिनिटाला आंद्रेस इनिएस्ताच्या पासवर सध्याचा स्पेनचा टॉप प्लेयर इस्कोने गोल केला आणि सामन्यात स्पेनला बरोबरी मिळवून दिली. यांनतर दोन्ही संघांकडून गोल करण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र कोणालाही यश येत नव्हते. अखेर ८१ व्या मिनिटाला मोरोक्कोच्या युसूफ अन नायसिरीने गोल करून आपल्या संघाला पुन्हा एकदा आघाडी मिळवून दिली. मात्र सुरूवातीचे दोन सामने गमावल्यामुळे मोरोक्को याआधीच स्पर्धेबाहेर गेला होता. ही मॅच मोरोक्को जिंकेल असे वाटत असतानाच अतिरीक्त मिळालेल्या वेळेत स्पेनच्या इयागो आसपासने गोल करून सामन्यात बरोबरी साधली. मात्र स्पेनच्या पूर्वीच्या अप्रतिम प्रदर्शनामुळे त्यांना बादफेरीत प्रवेश मिळाला आहे.

- Advertisement -
IRAN VS SPAIN
मोरोक्को विरूद्ध स्पेन सामन्यातील एक चुरशीचा क्षण

तर दुसरीकडे पोर्तुगाल आणि इराण सामना १-१ अशा बरोबरीत सुटला. पोर्तुगालकडून हाफ टाइम होण्याच्या काही क्षण आधीच रिकार्डो करीस्मा याने अप्रतिम गोल करत सामन्यात पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली. यानंतर पोर्तुगालकडून काही आक्रमणे करण्यात आली, मात्र त्यांना यश आलं नाही. हाफ टाईमनंतर इराणच्या चूकीमुळे पोर्तुगालला पेनल्टी किक मिळाली. मात्र रोनाल्डो पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करू शकला नाही. यानंतर ९० मिनिट झाली मात्र इराणला गोल करता आला नाही अतिरीक्त वेळेत पोर्तुगालच्या चूकीमुळे इराणला पेनल्टी किक मिळाली ज्या कीकचा इराणच्या करीमने गोलमध्ये रूपांतर करत सामन्याच्या अखेरीस इराणला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. मात्र पोर्तुगालने या आधी इराणपेक्षा अधिक गुण मिळवल्यामुळे त्यांना बादफेरीत प्रवेश मिळाला आहे.

c ronaldo
ख्रिस्तियानो रोनाल्डो किक घेताना
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -