घरक्रीडाFIFA वर्ल्डकप २०१८ - आज काय होणार?

FIFA वर्ल्डकप २०१८ – आज काय होणार?

Subscribe

फिफा वर्ल्डकपचा फीव्हर आता इंटरेस्टिंग टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. बाद फेरीत जाण्यासाठी तुल्यबळ संघांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. या सामन्यांमधून लवकरच बाद फेरीचं अर्थात नॉकआऊट राऊंडचं चित्र स्पष्ट होणार आहे.

फिफा विश्वचषकात बाद फेरीत पोहोचण्यासाठी प्रत्येक गटाचे सामने सुरू झाले असून आता विश्वचषकातील खरी चुरस पाहायला मिळत आहे. आज एफ आणि इ गटातील सामने होणार असून यातून जिंकणारे संघ बाद फेरीत पोहोचणार आहेत. आज एफ गटात जर्मनीविरूद्ध कोरिया रिपब्लिक, मेक्सिकोविरूद्ध स्वीडन तर दुसरीकडे इ गटातील सर्बियाविरूद्ध ब्राझील, स्वित्झरलंडविरूद्ध कोस्टा-रिका असे सामने रंगणार आहेत.

 

- Advertisement -

कसं असेल बाद फेरीचं चित्र?

सर्वात आधी भारतीय प्रमाणवेळेनुसार ७.३० ला एफ गटातील सामने होणार आहेत, ज्यात एकीकडे गतवर्षीचे विजेते जर्मनी कोरिया रिपब्लिकसोबत लढणार आहेत. कोरिया रिपब्लिकने आतापर्यंत आपले दोन्ही सामने हरल्यामुळे त्यांचे यावर्षीचे आव्हान संपुष्टात आले आहे. तर जर्मनीला बाद फेरीत जाण्यासाठी आजचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. मागील सामन्यात जर्मनीचा हिरो ठरलेल्या टोनी क्रुसवर आजच्या सामन्यात सर्वांच्याच नजरा असणार आहेत. तर याचवेळी सुरू असलेला एफ गटातील मेक्सिकोविरूद्ध स्वीडन सामनाही नक्कीच चुरशीचा होईल. कारण दोन्ही संघांचा आतापर्यंतचा परफॉर्मन्स चांगला आहे. मेक्सिकोने आतापर्यंत दोन सामने जिंकल्यामुळे ते गुणतालिकेत सर्वात वर आहेत. मात्र, स्वीडनने जर आजचा सामना २ गोलच्या फरकाने जिंकला, तर ते बाद फेरीत जाण्यासाठी पात्र ठरू शकतात.

sweedan
स्वीडन संघ

यानंतर इ गटातील सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार ११.३० ला सुरू होणार आहेत. इ गटात एकीकडे सर्बियाचा सामना ब्राझीलसोबत होणार आहे, ज्यात बाद फेरीत प्रवेशासाठी ब्राझीलला जिंकणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे सर्बिया जर चांगल्या फरकाने जिंकली तर ते बाद फेरीत जाऊ शकतात. ब्राझीलने आतापर्यंत सर्वाधिक ५ वेळा विश्वचषक जिंकला असला तरी मागील काही विश्वचषकात त्यांचं प्रदर्शन तितकंसं खास नाहीये. त्यामुळे यावर्षीचे त्यांचे भवितव्य आजच्या सामन्यावर अवलंबून असणार आहे. तर दुसरीकडे याचवेळी स्वित्झरलंड आणि कोस्टा रिका यांच्यात सामना सुरु असेल ज्यात स्वित्झरलंड जिंकले तर ते थेट बाद फेरीत जाणार आहेत. तर दुसरीकडे कोस्टा रिकाने दोन सामने हरल्यामुळे त्यांचे पुढे जाणे फार अवघड झाले आहे.

- Advertisement -
brazil
ब्राझील संघ

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -