घरक्रीडाऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दत्तू भोकनळ विरोधात गुन्हा दाखल

ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दत्तू भोकनळ विरोधात गुन्हा दाखल

Subscribe

२०१६च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नौकानयनपटू दत्तू भोकनळ याच्या विरोधात एका महिलेने शारीरीक आणि मानसिक शोषण केल्याची तक्रार एका महिलेने केली आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०१६च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नौकानयनपटू दत्तू भोकनळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने दत्तूवर गंभीर आरोप केले आहेत. दत्तूने या महिलेचे शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा दावा तिने केला आहे. या महिलेने केलेल्या तक्रारीनंतर आडगाव पोलिसांनी दत्तूच्या विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. कलम ४९८/४२० च्या अंतर्गत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ‘दत्तूने २२ डिसेंबर २०१७ ते ३ मार्च २०१९ या काळात दत्तूने शारीरीक आणि मानसिक त्रास देत माझी फसवणूक केली आहे’, असे या महिलेने म्हटले आहे.

तक्रारदार महिलेची दत्तूची पत्नी असण्याचा दावा

तक्रारदार महिलेने आपण दत्तूची पत्नी असल्याचा दावा केला आहे. ती पोलीस शिपाई आहे. दत्तू सोबत तिची २०१५ साली ओळख झाल्याचे तिने म्हटले आहे. २०१५ साली दत्तूला आर्मीमध्ये मेडल मिळाल्यामुळे चांदवडच्या गावकऱ्यांनी त्याचा सत्कार केला होता. या सत्कार समारंभात तिची दत्तू सोबत ओळख होऊन त्याच्याशी मैत्री झाली होती. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊन आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला, असे तिने पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीत तिने म्हटले आहे की, ‘डिसेंबर २०१७ मध्ये पुण्याच्या आळंदीला जाऊन एका कार्यालयात जाऊन हिंदू पद्धतीने लग्न केलं. मात्र, याबाबत कुठेही वाच्यता न करण्याचा निर्णय त्यांनी दोघांनी घेतला होता. मात्र त्यानंतर दोघांनी नातेवाईकांच्या समक्ष लग्न करण्याचे ठरवले. त्यानुसार महिलेने तिच्या नातेवाईकांना सांगून दोन वेळा लग्नाचे कार्यालय बुकही केले. मात्र, दत्तूच आला नाही. दत्तूने लग्नाला नकार दिला आणि लग्नाचा विषय काढला तर आत्महत्या करेल, अशी धमकी देखील दिली.’

- Advertisement -

दत्तू भोकनळची रोईंगमध्ये चांगली कामगिरी

दत्तू भोकनळने रोईंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. २०१६ मध्ये दत्तून रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत उत्तम कामगिरी दाखवत त्याने १३ वा क्रमांक पटकावला होता. विशेष म्हणजे रोईंगपटू म्हणून तो महाराष्ट्राचा पहिला खेळाडू ठरला. याशिवाय २०१५ च्या आशियाई रोईंग अजिंक्यपद स्पर्धेत दत्तूने रौप्यपदकाची कमाई केली होती. त्याने २०१८ च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक कमवले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -