घरक्रीडाIND vs AUS : चौथी कसोटी ब्रिस्बनमध्येच होणार; क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केले स्पष्ट 

IND vs AUS : चौथी कसोटी ब्रिस्बनमध्येच होणार; क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केले स्पष्ट 

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे.

ऑस्ट्रेलियातील इतर राज्यांपेक्षा क्विन्सलँडमध्ये क्वारंटाईनचे नियम अधिक कडक आहेत. त्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी कसोटी ब्रिस्बनमध्ये खेळण्यास तयार नसल्याचे म्हटले जात होते. परंतु, बीसीसीआयने चौथी कसोटी इतरत्र खेळवण्याची विनंती केली नसून हा सामना ब्रिस्बनमध्येच होणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकली यांनी स्पष्ट केले.

आम्ही बीसीसीआयशी दररोज चर्चा करत आहोत. त्यांचा आमच्या सर्व निर्णयांना पाठिंबा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना कसोटी मालिका ठरल्याप्रमाणेच खेळायची आहे. त्यामुळे चौथा कसोटी सामना ब्रिस्बनहून इतरत्र हलवण्याचा आमचा विचार नाही, असे हॉकली सोमवारी म्हणाले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत असून तिसरा कसोटी सामना गुरुवारपासून सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. त्यानंतर ब्रिस्बन येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीला १५ जानेवारीपासून सुरुवात होईल.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्रांच्या माहितीनुसार, भारतीय संघ तिसरी आणि चौथी कसोटी सिडनीतच खेळण्यास उत्सुक होता. सिडनी ही न्यू साऊथ वेल्स या राज्याची राजधानी असून तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या वाढत आहे. त्यामुळे क्विन्सलँडमध्ये न्यू साऊथ वेल्सहून येणाऱ्या लोकांना बंदी घालण्यात आली आहे. परंतु, या गोष्टीचा परिणाम चौथ्या कसोटीवर होईल असे हॉकली यांना वाटत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -