बेल्जियमला मात देत, फ्रान्सची फायनलमध्ये एन्ट्री

फ्रान्सविरूद्ध बेल्जियम या सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यात फ्रान्सने बेल्जियमला १-० ने मात देत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे फ्रान्सने तिसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

सेंट पीटर्सबर्ग
फ्रान्सचा संघ

फिफा विश्वचषक आता अगदी अंतिम टप्प्यात पोहोचला असून पहिला सेमी फायनल सामना फ्रान्स आणि बेल्जियम यांच्यात पार पडला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात फ्रान्सने १-० च्या फरकाने बेल्जियमवर विजय मिळवला. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांकडून बरीच आक्रमणा करण्यात आली. मात्र ५१ व्या मिनिटाला फ्रान्सचा डिफेन्डर उमटिटी याने केलेला गोल स्पर्धेत निर्णायक ठरला.

france pl
सामन्यात विजयी गोल नोंदविणारा फ्रान्सचा डिफेन्डर उमटिटी

सामना सुरूवातीपासूनच अटीतटीचा सुरू होता. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये बेल्जियमकडून काही आक्रमणं झाली. मात्र फ्रान्सच्या तगड्या बचावापुढे त्यांची डाळ शिजली नाही. फ्रान्सकडूनही काही प्रयत्न झाले, मात्र बॉल गोलपोस्टला लागल्याने फ्रान्सला खातं खोलता आला नाही. त्यामुळे अत्यंत चुरशीच्या झालेल्या पहिल्या हाफच्या अखेर ०-० असाच स्कोर राहिला. सामन्याच्या उत्तरार्धात फ्रान्सकडून आक्रमक खेळी सुरू करण्यात आली. ज्यात ५१ व्या मिनिटाला फ्रान्सला यश आले. कॉर्नरवरून आलेल्या बॉलला हेडद्वारे गोलपोस्टमध्ये टाकत फ्रान्सचा डिफेन्डर उमटिटीने फ्रान्सला सामन्यात १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर अगदी सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत दोन्ही संघांकडून आक्रमणं करण्यात आली मात्र कोणत्याही संघाला गोल करण्यात यश आलं नाही त्यामुळे ५१ व्या मिनिटाचा उमटिटीचा गोल निर्णायक ठरला आणि सामन्यात फ्रान्सने १-० ने विजय मिळवला.

फ्रान्सची तिसऱ्यांदा फायनलमध्ये धडक

फ्रान्सचा संघ १९९८ पासून तिसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचला आहे. सर्वात आधी १९९८ साली फ्रान्सचा संघ फायनलमध्ये पोहोचला होता विशेष म्हणजे त्यांनी ब्राझीलवर ३-० असा दमदार विजय मिळवत विश्वचषकही जिंकला होता. त्यानंतर २००६ साली पुन्हा एकदा फ्रान्सचा संघ फायनलमध्ये पोहोचला मात्र इटलीने त्यांना पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-३ ने पराभूत करत विजय मिळवला. २००६ नंतर थेट आता फ्रान्सचा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. आज होणाऱ्या इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यातील सामन्यात विजय मिळवणारा संघ फ्रान्ससोबत फायनलमध्ये लढेल.

france team 1998
१९९८ साली विजय मिळवलेला फ्रान्सचा संघ

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here