Fuzhou China Open : सिंधूची विजयी सुरुवात

सिंधूने पहिल्या फेरीत रशियाच्या एविग्नीया कोसेत्स्काया हिचा पराभव केला.

Mumbai
p v sindhu
पी. व्ही. सिंधू
भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने चीन ओपन स्पर्धेला विजयी सुरुवात केली आहे. तिने पहिल्या फेरीत रशियाच्या एविग्नीया कोसेत्स्काया हिचा पराभव करत स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ३० मिनिटे चाललेल्या सामन्यात सिंधूने कोसेत्स्कायाचा २१-१३, २१-१९ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

दुसऱ्या सेटमध्ये कोसेत्स्कायाची सिंधूला चांगली टक्कर

पहिल्या फेरीतील या सामन्याची सुरुवात सिंधूने अप्रतिम केली. तिने १५-१३ असा स्कोर असताना सलग ६ गुण मिळवत हा सेट २१-१३ अशा मोठ्या फरकाने जिंकला. बिनसीडेड कोसेत्स्कायाने दुसऱ्या सेटमध्ये तिसऱ्या सीडेड सिंधूला चांगली टक्कर दिली. त्यामुळे सिंधूला हा सेट जिंकण्यासाठी जरा मेहनत घ्यावी लागली. पण तिने योग्यवेळी आपला खेळ उंचावत हा सेट २१-१९ असा जिंकत हा सामनाही जिंकला. सिंधूचा दुसऱ्या फेरीत थायलंडच्या बुसानन हिच्याशी सामना होईल.

पोनप्पा-रेड्डी पराभूत

महिला दुहेरीच्या सामन्यात भारताची जोडी अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचा जपानच्या शिहो टनाका आणि कोहारू योनेमोटो या जोडीने २१-१९, १५-२१, २१-१७ असा पराभव करत स्पर्धेबाहेरचा रास्ता दाखवला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here