गणेश उपाध्याय ठरला नवोदित मुंबई श्री

Mumbai
ganesh upadhyay body builder
गणेश उपाध्याय

नवोदित शरीरसौष्ठवपटूंसाठी महत्वाची मानली जाणारी नवोदित मुंबई श्री स्पर्धा नुकतीच कांदिवली येथे पार पडली. प्रथमच शरीरसौष्ठव स्पर्धेच्या मंचावर उतरलेल्या बाल मित्र मंडळाच्या गणेश उपाध्यायने नवोदित मुंबई श्रीचा किताब पटकावला.

या स्पर्धेच्या प्रत्येक गटात ४० पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. एकूण या स्पर्धेला २६५ शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग लाभला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या ५५ किलो वजनी गटात पंपिंग आर्यनचा सतीश पुजारी, ६० किलो वजनी गटात गुरूदत्त जिमचा कल्पेश सौंदळकर, ६५ किलो वजनी गटात शिवसमर्थचा संदीप सावळे, तर ७० किलो वजनी गटात परब फिटनेसच्या अनिकेत यादवने, ७५ किलो वजनी गटात गणेश उपाध्याय, ८० किलो वजनी गटात टायगर फिटनेसच्या प्रदिप कदमने, तर ८० किलोवरील वजनी गटात अलेक्सर जिमच्या प्रदिप भाटियाने बाजी मारली.

अखेर गणेश उपाध्यायने नवोदित मुंबई श्रीचा मान पटकावला. त्याला मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत, सुनील शेगडे तसेच राज्य संघटनेचे सरचिटणीस विक्रम रोठे यांच्या हस्ते नवोदित मुंबई श्रीच्या किताबासह १५ हजारांचे रोख बक्षीस देण्यात आले.

नवोदित मुंबई श्रीचे निकाल-

५५ किलो वजनी गट : १) सतीश पुजारी, २) नितेश पालव, ३) कार्तिक मंडल
६० किलो वजनी गट : १) कल्पेश सौंदळकर, २) दीपक चौहान, ३) शशांक सकपाळ
६५ किलो वजनी गट : १) संदीप साबळे, २) वैभव जाधव, ३) सिद्धेश गाडे
७० किलो वजनी गट : १) अनिकेत यादव, २) अल्मेश मंचडे, ३) नदीम अन्सारी
७५ किलो वजनी गट : १) गणेश उपाध्याय, २) अरविंद सोनी, ३) कुणाल शिंदे
८० किलो वजनी गट : १) प्रदिप कदम, २) दीपक प्रधान, ३) कल्पेश नाडेकर
८० किलोवरील वजनी गट : १) प्रदिप भाटिया, २) हिमांशू शर्मा, ३) सम्राट ढाले

नवोदित मुंबई श्री : गणेश उपाध्याय (बाल मित्र मंडळ)