घरक्रीडागौतम गंभीरच्या आझीननंही केली 'यो - यो टेस्ट'पास

गौतम गंभीरच्या आझीननंही केली ‘यो – यो टेस्ट’पास

Subscribe

गौतम गंभीरनं आपली मोठी मुलगी आझीनचा एक व्हिडिओ शेअर केला असून सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बऱ्याच चाहत्यांना हा व्हिडिओ आवडत आहे.

दिल्लीचा क्रिकेटर आणि भारतीय टीमचा भाग असणारा गौतम गंभीर नेहमीच आपल्या मुलींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकताच गौतमनं आपली मुलगी आझीनचा एक व्हिडिओ शेअर केला असून सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आझीन ‘यो – यो टेस्ट’चं किड्स व्हर्जन पास करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या चाहत्यांना आवडत असून भरपूर कमेंट्सही मिळत आहेत. बीसीसीआयची ‘यो – यो टेस्ट’ सध्या सर्वच मॅचसाठी महत्त्वाची असते. क्रिकेटर्सचा फिटनेस या टेस्टमधून तपासून मगच खेळाडूंची निवड करण्यात येत असते. बरेच खेळाडू ही टेस्ट पास करत नसल्यामुळं संघात स्थान मिळवू शकत नाहीत.

गंभीरनं घेतली बीसीसीआयची फिरकी

व्हिडिओमध्ये गंभीरची मुलगी आझीन ‘यो – यो टेस्ट’च्या बऱ्याच लेव्हल्स पार करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी तिला अडचणींचा सामना करावा लागतो आहे. ४३ सेकंदाचा हा व्हिडिओ पोस्ट करताना ‘नीट बघा – माझी मुलगी अझीनानं यो – यो टेस्ट पास केली’ असं कॅप्शन देत या व्हिडिओमध्ये आपले मित्र युवराज सिंह, हरभजन सिंह आणि सचिन तेंडुलकर यांनाही टॅग केलं आहे. हा मजेशीर व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून त्याला बरेच हिट्सदेखील मिळत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisement -

गंभीर सध्या संघाच्या बाहेर

युवराज सिंह २०१७ मध्ये यो – यो टेस्ट पास करू शकला नव्हता. पण त्यानंतर त्यानं आपल्या फिटनेसवर काम करून रणजी खेळण्याचा निर्णय घेतला. दरम्यान युवराजला २०१९ चा वर्ल्डकप खेळण्याची इच्छा आहे. तर गौतम गंभीरही संघाच्या बाहेर आहे. ३७ वर्षीय गौतम गंभीरचं आंतरराष्ट्रीय करिअर संपणार का? सध्या हादेखील प्रश्न त्याच्या चाहत्यांना सतावत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -