घरक्रीडामॅक्सवेल, फिंचची आयपीएलकडे पाठ

मॅक्सवेल, फिंचची आयपीएलकडे पाठ

Subscribe

आयपीएलच्या लिलावासाठी १००३ खेळाडूंनी आपले नाव नोंदवले आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल आणि अॅरॉन फिंच यांचा समावेश नव्हता.

येत्या १८ डिसेंबरला जयपूर येथे होणाऱ्या आयपीएलच्या लिलावासाठी १००३ खेळाडूंनी आपले नाव नोंदवले आहे. यामध्ये २३२ खेळाडू हे परदेशी आहेत. खेळाडूंच्या नोंदणीसाठी मंगळवार हा अखेरचा दिवस होता. या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल आणि अॅरॉन फिंच यांचा समावेश नव्हता. मे, २०१९ मध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाला लक्षात घेता या दोघांनी आयपीएलचा पुढील मोसम न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

दोघांचा मागील मोसम चांगला राहिला नव्हता

ग्लेन मॅक्सवेल आणि अॅरॉन फिंच या दोघांसाठीही आयपीएलचा मागील मोसम चांगला राहिला नव्हता. त्यांच्या निराशाजनक कामगिरीमुळेच दिल्ली डेअरडेव्हिल्सने (आता दिल्ली कॅपिटल्स) मॅक्सवेलला तर किंग्स इलेव्हन पंजाबने फिंचला करारमुक्त केले होते. असे असले तरी इतर संघ या दोघांना आपल्या संघात घेण्यास उत्सुक होते. मात्र, मे महिन्यात विश्वचषक आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये अॅशेस मालिका होणार असल्याने त्यांनी आयपीएलचा पुढील मोसम न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

लिलावात २०० आंतरराष्ट्रीय खेळाडू  

आयपीएलच्या आठ संघांमध्ये मिळून सध्या ७० जागा उपलब्ध आहेत. लिलावासाठी आपले नाव नोंदवलेल्या १००३ खेळाडूंमध्ये २०० आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. यामध्ये लसिथ मलिंगा, ब्रॅंडन मॅक्यूलम, डार्सी शॉर्ट, क्रिस वोक्स, सॅम करन, युवराज सिंग, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, जयदेव उनाडकट, वृद्धिमान सहा या खेळाडूंचा समावेश आहे. तर ८०० खेळाडू हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले आहेत. तसेच ३ खेळाडू हे कसोटी क्रिकेटचा दर्जा न मिळालेल्या देशांचे आहेत. आता आठही संघ या १००३ खेळाडूंपैकी आपल्याला हव्या असणाऱ्या खेळाडूंची यादी १० डिसेंबरपर्यंत आयपीएलला देतील. संघांनी त्यांच्या यादीत दिलेले खेळाडूच आयपीएलच्या लिलावासाठी उपलब्ध असतील.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -