सचिन तेंडुलकरची मुलगी सारा गिलची पत्नी, असं आम्ही नाही गूगल म्हणतंय

google search shows sara tendulkar as shubman gills wife

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि भारताचा युवा क्रिकेटपटू शुभमन गिल यांच्या रिलेशनच्या च्रचांना उधाण आलं असताना आता नवं ट्विस्ट यामध्ये आलं आहे. ते ट्विस्ट आणलं आहे गूगलने. गूगलवर सर्च केलं की सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही शुभमन गिलची पत्नी असल्याचं दिसतं.

शुभमन गिल आणि सारा सध्या चर्चेत आहेत. या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे, अशा चर्चांना उधाण आलं आहे. दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांदरम्यान आता गूगलने सचिनसाठी जावई शोध लावला आहे. काही दिवसांपूर्वी, गूगलने अनुष्का शर्माला राशिद खानची पत्नी दर्शविल्याची घटना समोर आली होती. हे प्रकरण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. याचे मजेशीर मीम्स देखील शेअर करण्यात आले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शुभमन गिलने नवी गाडी विकत होती. त्या गाडीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यावर सारा तेंडुलकरने त्याचं अभिनंदन केलं होतं. यावेळी तिने हार्ट इमोजी वापरला होता. त्यावर शुभमनने देखील हार्ट इमोजी वापरुन साराचे आभार मानले. ही बाब लक्षात येताच हार्दिक पांड्याने कमेंट करत गिलची थट्टा केली. ‘तिच्याकडूनही तुझे खूप खूप आभार’ अशी कमेंट हार्दिक पांड्याने केली.