घरक्रीडा#HappyBirthdayVirat आज विराटचा ३०वा वाढदिवस!

#HappyBirthdayVirat आज विराटचा ३०वा वाढदिवस!

Subscribe

एका मध्यमवर्गीय घरातून जन्मलेल्या विराटची विराट कामगिरी.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज ३०वा वाढदिवस आहे. विराटने आपल्या कारकिर्दीत विराट असे यश मिळवले आहे. त्याच्या वेगवान फलंदाजीमुळे तो जगातील सर्वात जास्त शतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. त्याने २१६ वनडे मॅचेसमध्ये १० हजार २३२ रन केले आहेत. यामध्ये त्याने ३८ शतक केले आहेत. त्याचबरोबर ७३ टेस्ट मॅचेसमध्ये ६ हजार ३३१ रन केले आहेत. ६२ टी ट्वेटी मॅचेसमध्ये २ हजार १०२ रन केले आहेत. विराट कोहलीने आईपीएलमध्येही तशीच कामगिरी केली आहे. आयपीएलच्या १६३ मॅचेसमध्ये त्याने ४ हजार ९४८ रन त्याने केले आहेत.

हेही वाचा – विराट कोहलीला दिव्यांची सलामी

- Advertisement -

असा होता विराटचा प्रवास

विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडिल पेशाने वकील होते तर आई गृहिणी. त्याच्या कुटुंबाने सांगितल्यानुसार, विराट लहानपणी तीन वर्षांचा असल्यापासून बॅट उचलून ती फिरवत होता. तो आपल्या वडिलांना बॉल टाकायला सांगायचा आणि तो बॅट उचलून फिरवायचा. विराट दिल्लीच्या उत्तम नगरमध्ये लहानाचा मोठा झाला. तो सर्वप्रथम ऑक्टोबर २००२मध्ये २००२-२००३ पॉली उम्रीगर ट्रॉफी स्पर्धेत १४ वर्षाखालील दिल्लीच्या संघातून खेळला. या स्पर्धेत त्याने सर्वाधिक १७२ धावा केल्या. या स्पर्धेतून मिळालेल्या यशानंतर तो पुढे चालत राहिला. त्यानंतर त्याने मागे वळून न बघता प्रगती केली. २००६ मध्ये विराटची भारताच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघात निवड झाली. त्यावेळी तो इंग्लंड दौऱ्यावर गेला. तिथे त्याने अजिंक्यपद मिळविले. २००८ मध्ये मलेशियामध्ये पार पडलेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा तो कर्णधार होता. प्रचंड चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर तो जिंकत राहिला. २०१७ मध्ये तो भारतीय क्रिकेट संघाचा वनडे मॅचचा कर्णधार झाला. त्याच्या वेगवान खेळीमुळे आज तो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे..

हेही वाचा – विराट कोहलीकडून ‘या’ गोष्टी शिकाच

- Advertisement -

वाढदिवसाचे सेलिब्रेशन हरिद्वारच्या आश्रमात

यावर्षी विराटचे लग्न बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत झाले. गेल्या वर्षी त्याने आपला वाढदिवस आपल्या क्रिकेट संघातील मित्रांसोबत सेलिब्रेट केला होता. आज तो अनुष्कासोबत हरिद्वारला गेला आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त तो आश्रमाला भेट देणार आहे.


हेही वाचा – विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०००० धावा करणारा फलंदाज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -