Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IND vs AUS : निकाल पचवणे अवघड - पेन

IND vs AUS : निकाल पचवणे अवघड – पेन

कर्णधार टीम पेनने यष्टींमागे तीन झेल टाकले.

Related Story

- Advertisement -

सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ४०७ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना पाचव्या दिवशी दुसऱ्याच षटकात भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे बाद झाला. त्यामुळे भारताची ३ बाद १०२ अशी अवस्था झाली होती. मात्र, यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाज भारतीय फलंदाजांवर दबाव टाकण्यात अपयशी ठरले आणि त्यांनी जेव्हा चांगली गोलंदाजी केली, तेव्हा क्षेत्ररक्षकांनी झेल सोडले. कर्णधार टीम पेनने यष्टींमागे तीन झेल टाकले. भारताने अखेर हा सामना अनिर्णित राखला. त्यामुळे हा निकाल पचवणे अवघड असल्याने सामन्यानंतर पेनने सांगितले.

आमची गोलंदाजी पाहता, आम्ही हा सामना नक्कीच जिंकू शकलो असतो. आमच्या गोलंदाजांनी विकेटच्या काही संधीही निर्माण केल्या. परंतु, त्यानंतरही हा सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे हा निकाल पचवणे अवघड आहे. माझ्या मते, आमच्या गोलंदाजांनी पाचव्या दिवशी उत्कृष्ट गोलंदाजी केली. नेथन लायनने विकेट मिळवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. वेगवान गोलंदाजांनी योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली. मात्र, आम्ही झेल पकडले नाही. मी स्वतः काही झेल सोडले. मी यष्टिरक्षणावर खूप मेहनत घेतो. मात्र, माझे आजचे यष्टिरक्षण फार निराशाजनक होते. मी आमच्या गोलंदाजांना साथ दिली नाही. आजचा दिवस माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट दिवसांपैकी एक होता, असे पेन म्हणाला.

- Advertisement -