घरक्रीडाVideo: हार्दिक पांड्याचे वडिलांना खास सरप्राईज!

Video: हार्दिक पांड्याचे वडिलांना खास सरप्राईज!

Subscribe

हार्दिक पांड्या आणि त्याच्या वडिलांच्या या भावनिक व्हिडिओला नेटिझन्सची तसंच क्रिकेट प्रेमींची चांगलीच पसंती मिळते आहे.

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या इंग्लंड दौरा संपवून नुकताच भारतात परतला. मायदेशी येताच हार्दिकने सर्वप्रथम आपल्या घरी हजेरी लावली. यावेळी त्याने त्याच्या वडिलांना एक छानंस सरप्राईज दिलं. इंग्लंड दौऱ्यामुळे हार्दिक गेल्या ३ महिन्यांपासून त्याच्या वडिलांना भेटला नव्हता. त्यामुळे त्यांना सरप्राईज देण्यासाठी तो घरी जाताच थेट त्यांच्या खोलीमध्ये गेला. त्यावेळी हार्दिकचे वडिल झोपलेले होते. मात्र, ज्यावेळी हार्दिकने त्यांना उठवलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता. आपल्या मुलाशी थेट ३ महिन्यांनतर अचानक भेट झाल्यामुळे, हार्दिकच्या वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. नेमके हेच क्षण आपल्या कॅमेरामध्ये कैद करुन त्याचा व्हिडिओ हार्दिकने सोशल मीडियावर शेअर केला. हार्दिकने पोस्ट केलेल्या हा खास व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये जबरदस्त व्हायरल होतो आहे. हार्दिक आणि त्याच्या वडिलांच्या या भावनिक व्हिडिओला नेटिझन्सची तसंच क्रिकेट प्रेमींची चांगलीच पसंती मिळते आहे.

 

View this post on Instagram

 

When you surprise daddy ❤️ #seeinghimafter3months

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

सौजन्य- हार्दिक पांड्या, ट्वीटर

- Advertisement -

नुकताच झाला होता ‘ट्रोल’

दरम्यान इंग्लंड दौऱ्यात काही खास कामगिरी करु न शकलेला हार्दिक पांड्या, नुकताच एका फोटोमुळे चांगलाच ट्रोल झाला होता. हार्दिकने इंग्लंड दौऱ्यावरून परताताना एक फोटो अपलोड केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहीले आहे की, “परत भारतात परत आलोय. मात्र रिझल्ट्सने आम्ही खुश नाही आहोत. पण तरी आम्ही चांगला लढा दिला आणि घरी येऊन बरं वाटतंय. काही दिवसांतच आशिया कपला जायचे असल्याने काही दिवसच घरी राहता येणार आहे.” या पोस्टनंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी कमेंट्सद्वारे भरभरुन त्यांचा राग व्यक्त केला. एकाने तर हार्दिकचा फोटो एडिट करत त्याला चक्क विदूषक म्हटले.


वाचा : १०२ वर्षाच्या भारतीय आजीबाईचा नवा विक्रम 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -