हरमनप्रीत कौरची डिग्री खोटी, डीएसपी पद जाणार

पंजाब सरकारच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरमनप्रीत कौर ही केवळ १२ वी उत्तीर्ण आहे. त्यामुळं तिला फक्त शिपाई हे पदच दिलं जाऊ शकतं.

Mumbai
harmanpreet
हरमनप्रीत कौर

भारतीय महिला क्रिकेट टीमच्या टी – २० ची कॅप्टन हरमनप्रीत कौरची मार्कशीट खोटी असल्याची माहिती मिळाल्यानंतर आता हरमनप्रीत कौरच्या पंजाब पोलीस उपअधीक्षकाच्या नोकरीवर गदा आली आहे. क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून देशाचा मान वाढवल्याबद्दल हरमनप्रीतला रेल्वेची नोकरी देण्यात आली होती आणि त्यानंतर तिला पंजाब पोलीसमध्ये उपअधीक्षकाचं पद देण्यात आलं होतं. मात्र, आता तिची डिग्री खोटी असल्याचं कळल्यानंतर डिमोशन करण्यात येत असल्याची बातमी आहे. नुकतंच हरमनप्रीत कौरला २०१६ – १७ साठी सर्वश्रेष्ठ महिला क्रिकेटर म्हणून निवडण्यात आलं होतं.

डीएसपी पदावरून हटवणार

‘टाइम्स ऑफ इंडिया’नं दिलेल्या वृत्तानुसार, पंजाब सरकारनं अर्जुन पुरस्कार विजेती खेळाडू हरमनप्रीत कौरचं पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) पद हटवणार असून तिला शिपाई हे पद देण्यात येणार आहे. पंजाब सरकारच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरमनप्रीत कौर ही केवळ १२ वी उत्तीर्ण आहे. त्यामुळं तिला फक्त शिपाई हे पदच दिलं जाऊ शकतं. त्यामुळं तिला शिपाई पदावर राहायचं असल्यास, तिनं कळवावं. तिला डीएसपी हे पद देता येणार नाही असं कळवण्यात आलं आहे. दरम्यान, हरमनप्रीतच्या व्यवस्थापकानं ‘आम्हाला पंजाब पोलिसांकडून नोकरीसंदर्भात कोणतंही अधिकृत पत्र आलं नाही. हरमनप्रीतची डिग्री तिच आहे, जी रेल्वे नोकरीसाठी जमा करण्यात आली होती. असं असताना ही डिग्री खोटी कशी असू शकते?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.

तपासत डिग्री खोटी असल्याचं उघड

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहविभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव एन.एस. कलसी यांनी पोलीस विभागाला हरमनप्रीतला शिपायाची जागा देण्यासाठी लेखी कळवलं आहे. तर, नुकतंच सीसीसएस विद्यापीठाचे प्रबंधक जीपी श्रीवास्तव यांनी सांगितलं की, मार्च महिन्यात पंजाब पोलिसांनी हरमनप्रीतची मार्कशीट तपासण्यासाठी पाठवली होती. तपासानंतर ही मार्कशीट खोटी असल्याचं सिद्ध झालं असून या मार्कशीटची कोणतीही नोंद विद्यापीठात नाही. यासंदर्भातील अहवाल एप्रिलमध्येच पाठवण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.

रेल्वे नोकरीसंदर्भातदेखील होता वाद

हरमनप्रीत कौरच्या रेल्वे नोकरीसंदर्भातदेखील वाद होता. पंजाब पोलीसमध्ये दाखल होण्यापूर्वी ती पश्चिम रेल्वेमध्ये कार्यरत होती. तिचा ५ वर्षाचा करार असूनही ३ वर्षातच तिनं ही नोकरी सोडली होती. दरम्यान, या खोट्या डिग्रीसंदर्भात हरमनप्रीतच्या वडिलांनी हा तपास चुकीचा असल्याचं म्हटलं असून तिचं १२ वी पर्यंतचं शिक्षण हे मोगामधून झालं. तर त्यानंतर टीममध्ये निवड झाल्यामुळं तिनं डिग्री मेरठमधून पूर्ण केल्याचं सांगितलं आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here