घरक्रीडाशिक्षणासाठी क्रिकेट सोडले, पण क्रिकेटनेच दिली ओळख

शिक्षणासाठी क्रिकेट सोडले, पण क्रिकेटनेच दिली ओळख

Subscribe

२७ वर्षीय सौरभ नेत्रवळकर हा डाव्या हाताचा गोलंदाज आहे. २०१० साली झालेल्या आईसीसी अंडर वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमचा भाग होता. त्यावेळी त्याने ६ सामने खेळले.

२०१० साली झालेल्या अंडर १९ सामन्यात तो खेळला. त्याने या मॅचमध्ये सर्वाधिक विकेट घेतले. पण त्याने शिक्षणासाठी मुंबई सोडली आणि अमेरिकेला स्थायिक झाला. पण आता हा भारतीय खेळाडू चक्क अमेरिकेच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन झाला आहे. सौरभ नेत्रवलकर असे या खेळाडूचे नाव आहे. सौरभ ओमानमध्ये होणाऱ्या वर्ल्ड क्रिकेट लीग डिवीजन- ३ टुर्नामेंटसाठी कॅप्टन पदाची धुरा सांभाळणार आहे. हा सामना २०२३ साली होणाऱ्या वर्ल्डकपसाठी क्वालिफायर सामना असणार आहे.

इब्राहिम खलीलची घेतली जागा

सौरभला गेल्याच महिन्यात कॅप्टन घोषित करण्यात आले. या आधी ३६ वर्षीय इब्राहिम खलील हा अमेरिका क्रिकेट टीमचा कॅप्टन होता. तोही भारतीयच होता. हैदराबादमध्ये जन्मलेला इब्राहिम देशात हैदराबाद आणि आईसीएलमध्ये सामने खेळण्यानंतर तो अमेरिकेला स्थायिक झाला. आणि अमेरिकेच्या क्रिकेट टीमच्या कॅप्टन पदाची धुरा सांभाळली.

- Advertisement -

कोण आहे सौरभ नेत्रवळ ?

२७ वर्षीय सौरभ नेत्रवळकर हा डाव्या हाताचा गोलंदाज आहे. २०१० साली झालेल्या आईसीसी अंडर वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमचा भाग होता. त्यावेळी त्याने ६ सामने खेळले. ज्यात त्याने लक्षणीय कामगिरी करुन ६ विकेट घेतले. नेत्रवलकर याने रणजी सामने देखील खेळले आहेत. पण त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनीअरींगसाठी तो अमेरिकेत गेला. त्याने शिक्षणासोबत क्रिकेटचा सरावही सुरु ठेवला आणि आज तो अमेरिकेच्या कॅप्टन पदावर पोहोचला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -