घरक्रीडाखराब कामगिरीला दोहातील उष्णता जबाबदार!

खराब कामगिरीला दोहातील उष्णता जबाबदार!

Subscribe

भारताची धावपटू द्युती चंदने नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली. द्युतीने मागील काही काळात चांगली कामगिरी केली आहे. राष्ट्रीय स्पर्धेत तिने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला. या शर्यतीच्या उपांत्य फेरीत तिने ११.२२ अशी वेळ नोंदवली. मात्र, २०२० टोकियो ऑलिम्पिकला पात्र होण्यासाठी ते पुरेसे नव्हते.

ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी ११.१५ किंवा त्यापेक्षा कमी वेळेत शर्यत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे ती यापुढील स्पर्धांमध्ये ती ही वेळ नोंदवण्याचा प्रयत्न करणार आहे. नुकत्याच दोहा येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत तिने १०० मीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी ११.४८ सेकंद अशी वेळ घेतली होती. माझ्या जागतिक स्पर्धेतील खराब कामगिरीला दोहातील उष्णता जबाबदार आहे, असे विधान द्युतीने केले.

- Advertisement -

दोहा येथे झालेल्या जागतिक स्पर्धेसाठी मी खूप तयारी केली होती आणि त्यामुळेच रांची येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत मला इतके यश मिळाले. मी दोहामध्ये चांगली कामगिरी करू शकले नाही, कारण तिथे खूप उष्णता होती. माझ्या शरीराला त्या हवामानाशी जुळवून घेता आले नाही, असे द्युतीने सांगितले.

तसेच ऑलिम्पिक पात्रतेबाबात ती म्हणाली, यावर्षीच्या स्पर्धा संपल्या आहेत. त्यामुळे मी पुढील वर्षीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा कधी सुरू होणार, याची घोषणा होण्याची वाट पाहत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -