घरक्रीडामाझ्या ‘हेलिकॉप्टर शॉट’चा धोनीही चाहता

माझ्या ‘हेलिकॉप्टर शॉट’चा धोनीही चाहता

Subscribe

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनीने ‘हेलिकॉप्टर शॉट’ला खूप लोकप्रिय केले आहे. त्याच्या या फटक्याचे अनेक खेळाडूंनी अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, फारशा खेळाडूंना धोनीप्रमाणे हा फटका मारण्यात यश आलेले नाही, परंतु मुंबई इंडियन्सकडून खेळणारा हार्दिक पांड्या यंदाच्या आयपीएलमध्ये हा फटका खूप अप्रतिमरीत्या मारताना दिसला आहे. त्याने धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्धही हेलिकॉप्टर शॉट मारला होता आणि धोनीलाही माझा हा फटका आवडला, असे हार्दिकने सांगितले.

मी ‘हेलिकॉप्टर शॉट’ एखाद्या सामन्यात खेळेन असे मला कधीही वाटले नव्हते. मी मागील काही काळापासून नेट्समध्ये या फटक्याचा सराव करत आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यानंतर मी धोनीच्या खोलीत जाऊन, त्याला माझा हेलिकॉप्टर शॉट आवडला का असे विचारले आणि तो माझा फटका चांगला होता असे म्हणाला, असे हार्दिकने सांगितले.

- Advertisement -

हार्दिक यंदाच्या आयपीएलमध्ये अप्रतिम फटकेबाजी करत आहे. त्याने या स्पर्धेच्या ९ सामन्यांत १९४.६४ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. याआधी तू इतकी चांगली फटकेबाजी कधी केली आहेस का असे विचारले असता हार्दिकने सांगितले, मला तसे वाटत नाही. मी नेट्समध्ये कसून सराव करत आहे आणि माझी सध्या खूप चांगली फलंदाजी होत आहे. मी अगदी अखेरच्या षटकांतही माझ्या खेळात फार बदल करत नाही. मी गोलंदाजाने चूक करण्याची वाट पाहतो. सध्या मी हुशारीने फलंदाजी करत आहे. या मोसमात अजून ५ साखळी सामने बाकी आहेत आणि त्यानंतर प्ले-ऑफचेही सामने आहेत. या सामन्यांत चांगली फलंदाजी सुरू ठेवण्याचे माझे लक्ष्य आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -