घरक्रीडासानिया मिर्झाची अंतिम फेरीत धडक

सानिया मिर्झाची अंतिम फेरीत धडक

Subscribe

होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची युक्रेनियन साथी नादिया किचेनॉकने होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

तब्बल दोन वर्षांनंतर टेनिस कोर्टवर पुनरागमन करणारी सानिया आणि किचेनॉकने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्लोव्हेनियाची तमारा झिडॅन्सेक आणि चेक प्रजासत्ताकची मॅरी बुझकोवा या जोडीवर ७-६ (३), ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

- Advertisement -

उपांत्य फेरीतील सामन्याच्या पहिल्या गेममध्ये झिडॅन्सेक-बुझकोवा या जोडीने सानिया-किचेनॉकला चांगली झुंज दिली. मात्र, सानिया-किचेनॉकने टाय-ब्रेकर ७-३ असा जिंकत सेट जिंकला.

दुसर्‍या सेटमध्ये त्यांनी अधिक आक्रमक खेळ केला. त्यामुळे त्यांनी हा सेट ६-२ असा मोठ्या फरकाने जिंकत स्पर्धेत आगेकूच केली. आता अंतिम फेरीत त्यांच्यासमोर झान्ग श्वाई आणि पेंग श्वाई या दुसर्‍या सीडेड चिनी जोडीचे आव्हान असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -