घरक्रीडाHockey World Cup 2018 : बलाढ्य हॉलंडला टक्कर देण्यास भारत सज्ज

Hockey World Cup 2018 : बलाढ्य हॉलंडला टक्कर देण्यास भारत सज्ज

Subscribe
प्रदीर्घ कालावधीनंतर वर्ल्ड कप हॉकी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करणाऱ्या यजमान भारताची गाठ गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीत माजी विजेत्या हॉलंडशी पडणार असून या सामन्यासाठी कलिंग स्टेडियमवर हाऊसफुल गर्दी असणार हे निश्चित. करोडो भारतीयांच्या शुभेच्छा मनप्रीतच्या संघाला आहेतच. पण वर्ल्ड कप हॉकी स्पर्धेत आतापर्यंत तरी हॉलंडसमोर भारताची डाळ शिजलेली नाही. पण गुरुवारी १५ हजार प्रेक्षकांच्या साथीने कलिंग स्टेडिअमवर मनप्रीत आणि त्याचे सहकारी कसे खेळतात याकडे साऱ्या देशाचे लक्ष असेल.

चूक करणे पडेल महागात 

यंदा झालेल्या स्पर्धेत भारताने चांगला खेळ केला आहे असे म्हणता येणार नाही. पण तरी त्यांनी उपांत्यपपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मात्र, उपांत्यपपूर्व फेरीत हॉलंडसारख्या तुल्यबळ संघाविरुद्ध छोटीशी चूकही भारताला महागडी ठरू शकेल याची कल्पना प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांना असून त्यांनी पत्रकार परिषदेत आपल्या चेल्यांना इतिहास विसरून वर्तमानात पहा असे सांगितले. भारताच्या तुलनेत हॉलंडने यंदाच्या स्पर्धेत चांगला खेळ केला आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी जर्मनीने हॉलंडला नमवले. पण पाकिस्तान आणि मलेशियावर मोठे विजय मिळवून त्यांनी आगेकुच केली.

हॉलंडविरुद्ध भारताने वर्ल्ड कपमध्ये एकही सामना जिंकला नाही

हॉलंडने भारताविरुद्ध वर्ल्ड कप स्पर्धेत ६ पैकी ६ सामने जिंकताना २६ गोल केले आहेत. पण इतिहास घडवण्यासाठी हरेंद्र आणि त्यांचे चेले कलिंग स्टेडिअमवर उतरतील ते करोडो प्रेक्षकांच्या पाठिंब्याने.
वेळ – ७ वाजल्यापासून 
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स १
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -