घरक्रीडाHockey World Cup 2018 : हॉलंडची पाकिस्तानवर मात; दोघांचाही क्रॉसओव्हरमध्ये प्रवेश 

Hockey World Cup 2018 : हॉलंडची पाकिस्तानवर मात; दोघांचाही क्रॉसओव्हरमध्ये प्रवेश 

Subscribe

हॉकी वर्ल्ड कपमधील गट 'ड' च्या सामन्यात हॉलंडने पाकिस्तानचा ५-१ असा पराभव केला.

हॉकी वर्ल्ड कपमधील गट ‘ड’ च्या सामन्यात हॉलंडने पाकिस्तानचा ५-१ असा पराभव केला. या विजयामुळे हॉलंडने क्रॉसओव्हरमध्ये प्रवेश केला आहे. तर या सामन्यात पराभव होऊनही पाकिस्तानने क्रॉसओव्हरमध्ये प्रवेश करून आपल्या आशा कायम राखल्या आहेत. गट ‘ड’ मध्ये पाकिस्तान आणि मलेशिया यांच्या खात्यात १-१ गुण होता. पण सरस गोल सरासरीमुळे पाकिस्तानने पुढील फेरीत प्रवेश केला.

हॉलंडचे झटपट ४ गोल 

या सामन्यात पहिल्या सत्राच्या सुरुवातीला पाकिस्तानने हॉलंडचा चांगला प्रतिकार केला. पण नंतर त्यांचा खेळ ढेपाळला. याचा फायदा घेत ७ व्या मिनिटाला ब्रिन्कमनने गोल करून हॉलंडचे खाते उघडले. पण पुढच्याच मिनिटाला भुट्टाच्या गोलमुळे पाकिस्तानने बरोबरी साधली. हॉलंडने मग गोलचा धडाका लावत ४ गोल केले. हॉलंडकडून वेलंटीन वर्गा (२७ वे मिनिट), बॉब डी वूगड (३७), जोर्रिट क्रून (४७) आणि मिंक वॅन डर मर्डेन (५९) यांनी गोल करून संघाचा विजय साजरा केला.

जर्मनीने पटकावले अव्वल स्थान 

गट ‘ड’ मधील दुसऱ्या सामन्यात जर्मनीने मलेशियाचा ५-३ असा पराभव करत गटामध्ये अव्वल स्थान पटकावले. त्यामुळे त्यांनी थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जर्मनीकडून टीम हर्जब्रूच आणि क्रिस्तोफर रुहर यांनी प्रत्येकी दोन तर मार्को मिल्टकाऊने एक गोल केला.
आता सोमवारी क्रॉसओव्हरमध्ये इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आणि फ्रान्स विरुद्ध चीन असे सामने होतील.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -