घरक्रीडाHockey World Cup 2018 : होगा तो वही, जो हम चाहेंगे -...

Hockey World Cup 2018 : होगा तो वही, जो हम चाहेंगे – हरेंद्र सिंग

Subscribe

इतिहास फक्त वाचायला असतो, डच खेळाडूंचे आव्हान स्वीकारण्यासाठी आम्ही तयार आहोत असे उद्गार भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी काढले. 

होगा तो वही, जो हम चाहेंगे, देशाच्या १३० कोटी जनतेला जे हवे आहे तेच आम्हाला करायचे आहे. भारतीय हॉकी संघ मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे. आमच्या डच (हॉलंड) प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आम्ही आमचा गृहपाठ केला असून आक्रमणाला आक्रमणाने उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, डच खेळाडूंचे आव्हान स्वीकारण्यासाठी आम्ही तयार आहोत असे उद्गार भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी काढले.

इतिहास फक्त वाचायला असतो

इतिहास फक्त वाचायला असतो असे त्यांनी एका प्रश्नाच्या संदर्भात सांगितले. वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला हॉलंडविरुद्ध अद्याप सामना जिंकता आलेला नाही याकडे हरेंद्र यांचे लक्ष नेले असता त्यांनी इतिहास फक्त वाचायला असतो असे नमूद केले. हॉलंड संघ जसा तयारीनिशी उतरला आहे तसेच वर्ल्ड कपमध्ये सगळेच संघ जिंकण्यासाठी उतरतात असे हरेंद्र म्हणाले. गेले सहा महिने भारतीय संघाने इतिहास घडवला आहे असेही ते म्हणाले. वर्ल्ड कप स्पर्धेत तुम्हाला सर्वच अव्वल संघांचा सामना करावा लागतो. इतकी वर्षे आम्ही मेहनत करतोय, सराव करतोय. आम्ही त्यात फारसा बदल करणार नाही. हॉलंड संघाचा आक्रमक खेळावर भर असतो आणि आमचेही तसेच आहे. गुरुवारच्या लढतीत आम्हाला संधी गमवून चालणार नाही. गोल करण्याची संधी मिळाल्यास गोल करावाच लागेल.

प्रेक्षक म्हणजे जणू राखीव बारावा खेळाडू

सामन्याचे विश्लेषण पाहताना प्रतिस्पर्ध्यांच्या डावपेचांचा विचार केला जातो. पेनल्टी कॉर्नरमध्ये डच खेळाडू वाकबगार आहेत. पेनल्टी कॉर्नर वाचवण्यापेक्षा पेनल्टी कॉर्नर त्यांना मिळणारच नाहीत याची काळजी घ्यायला हवी. गोलरक्षकाविना खेळणे यातून संघाचा आत्मविश्वास दिसून येतो. आक्रमणातील खेळाडूंना गोल करण्याच्या अधिक संधी मिळतील, यावर भर द्यायला हवा. धोके पत्करल्यास फरकाही होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना त्यांचा पाठिंबा आम्हाला असेल. प्रेक्षक म्हणजे जणू राखीव बारावा खेळाडू. त्यांच्याकडून स्फुर्ती मिळते. प्रशिक्षक म्हणून मला ही बाब रुचते. हे दडपण नसून तुम्ही त्याचा आस्वाद घ्यायला हवा. सहा महिन्यांपूर्वीच मला ठाऊक होते की आम्ही कधी, कोणाशी खेळणार आहोत. आम्ही त्याचा नीट अभ्यास केला असून काय करायचे ते आम्हाला ठाऊक आहे. आम्ही व्यावसायिक खेळाडू आहोत आणि आम्हाला काय करायचे हे माहित आहे. हॉलंडविरुद्धच्या लढतीत आम्हाला ढिलाई, गाफीलपणा परवडणार नाही. याआधीच्या सामन्यात हे घडले आहे याची मला कल्पना आहे. केवळ ६० मिनिटेच नाही तर ७४ मिनिटांच्या खेळावर लक्ष केंद्रित करायचे असे मी खेळाडूंना बजावले असल्याचे हरेंद्र म्हणाले.

आम्ही आता आक्रमक हॉकी खेळतो – मनप्रीत

भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत म्हणाला की, रिओ ऑलिम्पिकला २ वर्षे झाली. त्यानंतर आमची कामगिरी सुधारली आहे. हरेंद्र सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तयार होत आहोत. आम्ही आता आक्रमक हॉकी खेळतो आहोत. आम्हाला इतिहास बदलायचा आहे. आम्ही हॉलंडविरुद्धच्या सामन्यासाठी तयार आहोत.

प्रतिस्पर्ध्याचा विचार कशाला – श्रीजेश

भारताचा अनुभवी गोलरक्षक श्रीजेश म्हणाला की, माझ्याकडून तुम्हाला फारच अपेक्षा आहेत. पण प्रशिक्षकांच्या अपेक्षेनुसार मी खेळ करतोय. आम्हाला वर्ल्ड कप जिंकायचा आहे. खेळावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे; प्रतिस्पर्ध्याचा विचार कशाला करायचा. आमच्या जमेच्या बाजूचा विचार करायला हवा. मैदानातील कामगिरी महत्वाची असेही श्रीजेश म्हणाला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -