घरक्रीडाश्रीकांतची उपांत्य फेरीत धडक

श्रीकांतची उपांत्य फेरीत धडक

Subscribe

हाँगकाँग ओपन बॅडमिंटन

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने हाँगकाँग ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. शुक्रवारी या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतचा सामना चीनच्या चेन लाँगशी झाला. मात्र, दुखापतीमुळे लाँगने या सामन्यात अर्ध्यातच माघार घेतली. श्रीकांतने या स्पर्धेत आगेकूच केल्यामुळे भारताचेही या स्पर्धेतील आव्हान जिवंत आहे.

पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत बिनसीडेड श्रीकांतचा सामना चीनच्या लाँगशी झाला. या सामन्याचा पहिला गेम श्रीकांतने अवघ्या १५ मिनिटांत २१-१३ असा मोठ्या फरकाने जिंकला होता. त्यानंतर जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असणार्‍या लाँगने पुढे न खेळण्याचा निर्णय घेतला. लाँगविरुद्धचा सामना जिंकण्याची ही श्रीकांतची केवळ दुसरी वेळ होती.

- Advertisement -

आतापर्यंत या दोघांमध्ये ८ सामने झाले असून त्यापैकी ६ सामने लाँगने, तर केवळ २ सामने श्रीकांतने जिंकले आहेत. यावर्षी श्रीकांत आणि लाँग मलेशिया ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने आले होते. लाँगने हा सामना सरळ गेममध्ये जिंकला होता. हाँगकाँग ओपनआधी श्रीकांतचा लाँगविरुद्धचा एकमेव विजय २०१७ मध्ये आला होता. २०१७ ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये त्याने लाँगवर २२-२०, २१-१६ अशी मात केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -