घरक्रीडापरदेशात चांगल्या कामगिरीचे लक्ष्य!

परदेशात चांगल्या कामगिरीचे लक्ष्य!

Subscribe

भारताचा सलामीवीर रोहित शर्माला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत दोन शतके आणि एक द्विशतक लगावले आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असणार्‍या रोहितला या मालिकेआधी कसोटी क्रिकेटमध्ये मधल्या फळीत खेळताना फारसे यश मिळाले नव्हते. त्यामुळेच संघ व्यवस्थापन व निवड समितीने त्याला सलामीला खेळवण्याचा निर्णय घेतला आणि रोहितने त्यांचा विश्वास सार्थकी लावला. मात्र, केवळ घरच्या मैदानावर दमदार कामगिरी केल्याचे त्याला समाधान मानायचे नाही. आता त्याला परदेशातही सलामीवीर म्हणून खेळताना चांगली कामगिरी करायची आहे.

तुम्हाला जेव्हा संधी मिळते, तेव्हा तुम्हाला त्याचे सोने करायचे असते. मला या मालिकेत सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी देण्यात आली. मला या संधीचा चांगला उपयोग करणे गरजेचे होते. मी खराब कामगिरी केली असती, तर माझ्याबाबत बर्‍याच गोष्टी लिहिल्या गेल्या असत्या. परंतु, मला या धावांचा फार विचार करायचा नाही. आता मी परदेशी आव्हानाची वाट पाहत आहे. माझे परदेशातही चांगल्या कामगिरीचे लक्ष्य आहे, असे दुसर्‍या दिवसाच्या खेळानंतर रोहित म्हणाला.

- Advertisement -

सलामीवीर म्हणून तू का इतका यशस्वी ठरत आहेस असे विचारले असता त्याने सांगितले, सलामीवीर म्हणून खेळणे आणि सहाव्या-सातव्या क्रमांकावर खेळणे या दोनमध्ये खूप फरक आहे. सामन्याचा पहिला चेंडू खेळणे आणि ३०-४० षटकांनंतर फलंदाजीला येणे या दोन्ही परिस्थितींमध्ये वेगवेगळी आव्हाने असतात. तुम्हाला मानसिकता थोडी बदलावी लागते. मात्र, मी तंत्रात बदल केलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -