घरक्रीडासंघ निवडीत वारंवार चुका होतातच कशा ? - सुनील गावस्कर

संघ निवडीत वारंवार चुका होतातच कशा ? – सुनील गावस्कर

Subscribe

गावस्करांच्या मते जर योग्य संघ निवडला तर भारत या मालिकेतील पुढील दोन सामने जिंकू शकतो.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे झालेला दुसरा कसोटी सामना भारताने १४६ धावांनी गमावला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने या ४ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. या सामन्यात भारताने ४ वेगवान गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी संघात एकही फिरकीपटू खेळवला नाही. तर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नेथन लायनने या सामन्यात अप्रतिम प्रदर्शन केले. त्याने सामन्यात ८ विकेट घेत सामनावीराचा पुरस्कार मिळवला. अखेर दोन्ही संघांमध्ये हाच फरक महत्त्वाचा ठरला. मात्र संघ निवडीमध्ये चूक होण्याची ही पहिली वेळ नाही. द.आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यांमध्येही भारताने संघ निवडीमध्ये चुका केल्या होत्या. त्यामुळे संघ निवडीत वारंवार चुका होतातच कशा असा प्रश्न सुनील गावस्करांनी उपस्थित केला आहे.

संघ निवडताना अधिक काळजी घेणे आवश्यक  

गावस्कर म्हणाले, “भारतीय संघ व्यवस्थापन दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून सातत्याने संघ निवडीमध्ये चुका करत आहे. या चुका भारताला महागात पडत आहेत. त्यामुळे जे सामने त्यांनी जिंकले पाहिजेत ते सामने भारतीय संघ गमावत आहे. संघ निवडीत वारंवार चुका होतातच कशा ? व्यवस्थापनाने संघ निवडताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. जर योग्य संघ निवडला तर भारत या मालिकेतील पुढील दोन सामने जिंकू शकतो. पण जर भारताने हे दोन सामने गमावत ही मालिका गमावली तर कर्णधार (विराट कोहली) आणि प्रशिक्षक (रवी शास्त्री) यांच्यापासून संघाला काही लाभ होतो आहे का, याचा विचार निवड समितीला करावी लागेल.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -