मला देखील क्रिकेटमध्ये वर्णद्वेषाचा सामना करावा लागला; ख्रिस गेलचा खुलासा

अमेरिकेत झालेल्या जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर निषेध करताना गेलंनं याबाबतचा खुलासा केला.

Jamaica
chris gayle

युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडीजचा स्फोटक सलामीवीर ख्रिस गेलला देखील वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. गेलच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यालाही वर्णद्वेषी टिप्पण्यांचा सामना करावा लागला होता, असं ख्रिस गेलनं सांगितलं आहे. अमेरिकेत झालेल्या जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर निषेध करताना गेलंनं याबाबतची माहिती सांगितली. ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ या मोहिमेवर एकता दर्शविताना वेस्ट इंडीजचा स्टार फलंदाज ख्रिस गेलने असा आरोप केला आहे की, क्रिकेटमध्ये देखील वर्णद्वेष आहे.

View image on Twitter

वर्णभेदाचा सामना कुठे आणि कधी करावा लागला याबाबतचा खुलासा गेलने केला नाही, परंतु टी-२० लीग दरम्यान ही घटना घडल्याचं संकेत दिले. “मी जगभर खेळलो आहे आणि काळा असल्यामुळे वर्णद्वेषाच्या टिप्पण्यांचा सामना केला आहे,” असं गेलने सोशल मिडीयावर लिहिलं आहे. गेलने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं आहे की, “काळ्या लोकांचे आयुष्यही इतरांच्या आयुष्यासारखं असतं. काळे लोक महत्त्वाचे आहेत. (ब्लॅक लाइव्ह्स मॅटर) वर्णद्वेषी लोक नरकात जावोत. वर्णद्वेषी केवळ फुटबॉलमध्येच नाहीत, तर क्रिकेटमध्ये देखील आहेत. अगदी काही संघांमध्ये देखील वर्णद्वेषाचा सामना केला आहे, असं गेलनं म्हटलं आहे.


हेही वाचा – पंतप्रधान स्वनिधी योजना : छोट्या विक्रेत्यांना मिळणार १० हजाराचं कर्ज