घरक्रीडा'मी जिवंत असून व्यवस्थित आहे' - अब्दुल रझाक

‘मी जिवंत असून व्यवस्थित आहे’ – अब्दुल रझाक

Subscribe

एका दुर्घटनेत अब्दुल रझाकचा मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र दस्तुरखुद्द अब्दुल रझाकनंच या बातमीचा समाचार घेतला आहे.

सोशल मीडिया या माध्यामाचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे आहेत. दर दिवशी कोणत्यातरी मोठ्या व्यक्तीच्या मरणाची अफवा सोशल मीडियावर येत असते. त्यामुळे त्या व्यक्तीला आणि त्याच्या चाहत्यांनाही मनस्ताप होतो. असंच घडलं आहे, पाकिस्तानी ऑलराऊंडर खेळाडू अब्दुल रझाकबरोबर. एका दुर्घटनेत अब्दुल रझाकचा मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र दस्तुरखुद्द अब्दुल रझाकनंच या बातमीचा समाचार घेतला आहे.

व्हिडिओद्वारे ठीक असल्याचं केलं नमूद

अब्दुल रझाकच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली. ही बातमी खोटी असूनही बऱ्याच लोकांनी शेअर केली होती. मात्र, व्हायरल झालेली बातमी खोटी असल्याचं अब्दुल रझाकनं स्वतः सांगितलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंट आणि युट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट करत ही बातमी अजिबात खरी नसल्याचं त्यानं नमूद केलं आहे. दरम्यान फेसबुकला कोणीतरी ही खोटी बातमी दिली असल्याचं त्यानं म्हटलं आहे. या बातमीनुसार अब्दुल रझाकला अपघात झाला असून त्यात त्याचा मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं. तर, ‘ही अतिशय खेदजनक बाब असून लोकांनी असं करू नये, मी अगदी ठीक आहे.’ असं अब्दुलनं आपल्या चाहत्यांना सांगितलं आहे.

- Advertisement -

याआधीदेखील मृत्यूच्या खोट्या बातम्या

पाकिस्तानमध्ये याआधीदेखील क्रिकेटर्सच्या खोट्या मृत्यूच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. तर, भारतातील बऱ्याच बॉलीवूड स्टार्सच्यादेखील मृत्यूच्या बातम्या व्हायरल झाल्या. पाकिस्तानी ऑलराऊंडर असणारा अब्दुल रझाक आता क्रिकेटमधून निवृत्त झाला असून त्यानं आतापर्यंत ४६ टेस्ट मॅच खेळून १९४६ रन्स केले आहेत. तर २६५ वनडेमध्ये ५०८० रन्स बनवले आहेत. यामध्ये ३ सेंचुरी आणि २३ हाफसेंचुरीचा समावेश आहे. तर २६५ वनडेमध्ये २६९ विकेट्स त्यानं मिळवले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -