घरक्रीडासेंच्युरीसाठी खेळायला मी स्वार्थी नाही - अजिंक्य रहाणे

सेंच्युरीसाठी खेळायला मी स्वार्थी नाही – अजिंक्य रहाणे

Subscribe

भारतीय क्रिकेट संघ सध्या विंडिज दौऱ्यावर आहे. कालपासून अँटिगा येथे दोन्ही संघात पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. प्रथम बॅटिंग करत असताना भारतीय सलामीवीरांनी चांगलीच निराशा केली. पहिल्या आठ ओव्हरमध्ये भारताने २५ रन्सच्या बदल्यात मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीला गमावले. त्यानंतर पाच नंबरवर मैदानात उतरलेल्या अंजिक्य रहाणेने डाव सावरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत अंजिक्यला पत्रकारांनी तू सेंच्युरी करु शकला असतास असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना रहाणे म्हणाला की, ‘मला माझा संघ महत्त्वाचा आहे. सेंच्युरीसाठी खेळायला मी स्वार्थी नाही.’

पहिल्या दिवसाअखेर भारताने ६ बाद २०३ रन्स केल्या. यामध्ये रहणेच्या ८१ (१६९ बॉल्स) रन्सचा महत्त्वाचा वाटा होता. तीन विकेट गमावल्यानंतर रहाणेने लोकेश राहुलच्या मदतीने डाव सावरला होता. पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नानंतर अंजिक्य म्हणाला की, मला वाटलंच होतं की हा प्रश्न विचारला जाईल. पण मी सेंच्युरीसाठी खेळत नव्हतो. सामन्याची धावपट्टी ज्या प्रकारे आहे त्यानुसार माझ्या ८१ धावा देखील खूप महत्त्वाच्या ठरतात.

- Advertisement -

अजिंक्य रहाणेने शेवटची सेंच्युरी २०१७ साली श्रीलंकेच्या विरोधात खेळताना केलेली आहे. मी खेळायला उतरलो तेव्हा सेंच्युरी केली पाहीजे, असे मला वाटत होते. मात्र तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. २५ रन्सवर आमच्या ३ विकेट्स गेल्या होत्या. त्यामुळे संघाला अडचणीतून बाहेर काढणे, ही माझी प्राथमिकता होती आणि मी त्यावरच लक्ष केंद्रीत केले, असे रहाणेने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -