घरक्रीडामी टी-२० खेळू शकतो, हे सांगायची गरज नाही

मी टी-२० खेळू शकतो, हे सांगायची गरज नाही

Subscribe

ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघातून मागील काळ बाहेर आहे. त्याने आपला अखेरचा एकदिवसीय सामना जून २०१७ मध्ये तर जुलै २०१७ मध्ये खेळला आहे. मात्र, त्याच्या मते टी-२० क्रिकेटमध्ये तो अजूनही सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक आहे आणि मी टी-२० खेळू शकतो, हे मला कोणालाही सांगायची गरज नाही, असे अश्विन म्हणाला.

टी-२० क्रिकेटमध्ये माझी आकडेवारी खूप चांगली आहे. माझा इकोनॉमी ६.७२ चा आहे आणि आयपीएलमध्ये हरभजनसोबत मी सर्वाधिक सामने खेळणारा फिरकीपटू आहे. मागील टी-२० विश्वचषकात मी माझ्या संघासाठी अप्रतिम कामगिरी केली होती आणि एका सामन्यात मला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला होता. त्यामुळे मी टी-२० खेळू शकतो, हे मला कोणालाही सांगायची गरज नाही, असे अश्विनने सांगितले.

- Advertisement -

अश्विन आता जवळपास दोन वर्षे भारतासाठी टी-२० सामना खेळला नसला तरी तो आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने ४६ सामन्यांत ५२ विकेट घेतल्या आहेत. अश्विनच्या मते आता तंत्रज्ञान इतके विकसित झाल्याने गोलंदाजाला आपल्या गोलंदाजीत विविधता आणावीच लागते. तो म्हणाला, आता क्रिकेटमध्ये सगळे काही स्पष्ट दिसते. आता कॅमेरा तुमच्या बोटांच्या हालचालीवर लक्ष ठेऊ शकतो आणि फलंदाजाचे काम सोपे होते. त्यामुळे तुम्हाला आपल्या खेळात बदल करावाच लागतो, विविधता आणावीच लागते. विराट कोहलीचेच बघा. आधी तो लेगला जास्त फटके मारायचा. मात्र, आता तो ऑफलाही तितक्याच चांगल्या प्रकारे फटके मारतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -