धोनीप्रमाणेच मी निकालांचा फारसा विचार करत नाही!

Mumbai
भुवनेश्वर कुमारचे विधान

भारताची वेगवान गोलंदाजांची फळी सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम मानली जाते. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा यांच्यासोबतच भुवनेश्वर कुमारने मागील काही वर्षांमध्ये भारताच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला भुवनेश्वर केवळ नव्या चेंडूने गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जायचा.

परंतु, हळूहळू त्याने अप्रतिम यॉर्कर टाकण्यास सुरुवात केली आणि त्यामुळेच तो अखेरच्या षटकांतही गोलंदाजी करु लागला. अखेरच्या षटकांत गोलंदाजी करणे हे मोठे आव्हान असते. परंतु, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीप्रमाणेच भुवनेश्वरही निकालांचा फारसा विचार करत नाही.

धोनीप्रमाणेच मी निकालांचा फारसा विचार करत नाही. मी केवळ माझ्या कामगिरीवर आणि छोट्या-छोट्या गोष्टी योग्य पद्धतीने करण्यावर लक्ष केंद्रित करतो. याचा मला खूप फायदा झाला आहे. मी दोन-तीन आयपीएल मोसमांमध्ये फारच चांगली कामगिरी केली. त्यावेळीही मी निकालांचा विचार करत नव्हतो. मी केवळ योग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्याने मला आपोआपच सकारात्मक निकाल मिळाले, असे भुवनेश्वर म्हणाला. तसेच आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाकडून खेळल्याचा खूप फायदा झाल्याचेही भुवनेश्वरने सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here