घरक्रीडामला बळीचा बकरा बनवले - अँजेलो मॅथ्यूस

मला बळीचा बकरा बनवले – अँजेलो मॅथ्यूस

Subscribe

आशिया चषकातील खराब कामगिरीनंतर श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूसची पदावरून हकालपट्टी झाली. पण या खराब कामगिरीसाठी मला बळीचा बकरा बनवले जात आहे असे मॅथ्यूसचे म्हणणे आहे.

आशिया चषकात श्रीलंकेवर साखळी फेरीतच स्पर्धेबाहेर जाण्याची नामुष्की ओढवली. या त्यांच्या खराब कामगिरीनंतर अँजेलो मॅथ्यूसची कर्णधार पदावरून हकालपट्टी झाली. पण यामुळे मॅथ्यूस अतिशय नाराज झाला आहे. त्याच्यामते या निराशाजनक प्रदर्शनासाठी त्याला बळीचा बकरा बनवले जात आहे.

संघाला गरज नसल्यास होणार निवृत्त

आशिया चषकातील खराब प्रदर्शनानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डने मॅथ्यूसला कर्णधारपद सोडण्यास सांगितले. यानंतर मॅथ्यूसने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला पत्र लिहिले. ज्यात त्याने लिहिले, ‘आशिया चषकातील खराब कामगिरीबद्दलची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. पण या खराब प्रदर्शनाची फक्त माझ्या एकट्यावर जबाबदारी टाकणे योग्य नाही. याबद्दल मला अत्यंत वाईट वाटत आहे. मी जे काही निर्णय घेत होतो ते प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांशी संवाद साधूनच घेत होतो. मग संघाच्या खराब प्रदर्शनाची सगळी जबाबदारी माझ्या एकट्यावर टाकणे योग्य नाही. जर प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांना वनडे आणि टी-२० संघात माझी गरज नसेल तर मी निवृत्त होण्याचा विचार करीन.’

दुसऱ्यांदा कर्णधारपद सोडावे लागले 

अँजेलो मॅथ्यूसने २०१७ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धची वनडे मालिका गमावल्यानंतर आपले कर्णधारपद सोडले होते. मात्र योग्य कर्णधार न सापडल्याने त्याला काही महिन्यांपूर्वी पुन्हा कर्णधारपद दिले गेले. पण आता पुन्हा एकदा त्याला आपले कर्णधारपद सोडावे लागले आहे. तो मागील शुक्रवारी श्रीलंकेचे प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांना भेटला. तेव्हा त्यांनी त्याला आपले कर्णधारपद सोडण्यास सांगितले. त्याच्याजागी कसोटी संघाचा कर्णधार दिनेश चंडिमलला वनडे आणि टी-२० संघाचे कर्णधारपद दिले गेले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -