घरक्रीडाइंग्लंड पहिल्यांदा विश्वविजेते

इंग्लंड पहिल्यांदा विश्वविजेते

Subscribe
  बेन स्टोक्सच्या दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने ४४ वर्षांनी विश्वचषकावर आपले नाव कोरले. त्यांनी अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. विश्वचषक जिंकण्याची ही त्यांची पहिलीच वेळी होती. तसेच विश्वचषकाचा अंतिम सामान बरोबरीत संपण्याची ही पहिलीच वेळी होती. याआधी इंग्लंडला तीन वेळा, तर न्यूझीलंडला एक वेळा जेतेपदाची हुलकावणी दिली होती. २४२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला अखेरच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना एकच धाव काढता आल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला, ज्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना स्टोक्स आणि बटलरमुळे १५ धावा केल्या. मात्र, अखेरच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना त्यांना १ धावच काढता आली.

स्टोक्स-बटलरची निर्णायक भागीदारी 

न्यूझीलंडने दिलेल्या २४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची अडखळती सुरुवात झाली. त्यांचा सलामीवीर जेसन रॉय (१७), जो रूट (७), जॉनी बेअरस्टो (३६) आणि इयॉन मॉर्गन (९) झटपट माघारी परतले. त्यामुळे इंग्लंडची ४ बाद ८६ अशी अवस्था झाली. परंतु बेन स्टोक्स आणि जॉस बटलर यांनी इंग्लंडचा डाव सावरला. त्यांनी ११० धावांची भागीदारी करत इंग्लंडला विजयाच्या नजीक नेले. लॉकी फर्ग्युसनने बटलरला ५९ धावांवर बाद करत सामन्यात रंगत आणली. स्टोक्सने (नाबाद ८४) मात्र चांगली फलंदाजी सुरु ठेवली. अखेरच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना एकच धाव काढता आल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

निकोल्सचे संयमी अर्धशतक  

त्याआधी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा सलामीवीर मार्टिन गप्टिलने आक्रमक सुरुवात केली. मात्र, १९ धावांवर त्याला क्रिस वोक्सने पायचीत पकडले. यानंतर विल्यमसन आणि हेन्री निकोल्स यांनी संयमी फलंदाजी करत जवळपास १६ षटकांत ७४ धावांची भागीदारी केली. निकोल्सने ७१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. परंतु अनुभवी लियम प्लंकेट आधी विल्यमसन (३०), मग निकोल्सला (५५) माघारी पाठवले. पुढे एका बाजूने विकेट पडत असताना यष्टीरक्षक-फलंदाज टॉम लेथमने दुसरी बाजू लावून धरत  ५६ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडने ५० षटकांत ८ बाद २४१ अशी धावसंख्या उभारली. इंग्लंडकडून प्लंकेट आणि वोक्स यांनी ३-३ बळी घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -