घरक्रीडाICC Test Rankings : पुजाराची चौथ्या स्थानी झेप

ICC Test Rankings : पुजाराची चौथ्या स्थानी झेप

Subscribe

न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने या यादीत ९१३ गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली. त्याने आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच ९०० गुणांचा टप्पा पार केला आहे.

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला. या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ अडचणीत असताना चेतेश्वर पुजाराने शतक झळकावत भारताचा डाव सावरला होता. तर या सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने ७१ धावांची खेळी केली होती. या दमदार कामगिरीमुळे त्याने आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. त्याच्या खात्यात सध्या ८४६ गुण जमा आहेत.

विल्यमसनची दुसऱ्या स्थानी झेप

भारताचा कर्णधार विराट कोहलीने फलंदाजांच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. त्याच्या खात्यात ९२० गुण जमा आहेत. तर पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ८९ आणि १३९ धावांची खेळी करणाऱ्या न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने या यादीत ९१३ गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली. त्याने आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच ९०० गुणांचा टप्पा पार केला आहे. तर कसोटी क्रमवारीत ९०० गुणांचा टप्पा पार करणारा तो न्यूझीलंडचा पहिला खेळाडू आहे. विल्यमसनने पाकिस्तानविरुद्धच्या ३ सामन्यांच्या ६ डावांत ७७.२० च्या सरासरीने ३८६ धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडने ही मालिका २-१ अशी जिंकली. फलंदाजांच्या यादीत ९०१ गुणांसह स्टिव्ह स्मिथ तिसऱ्या तर जो रूट ८०७ गुणांसह पाचव्या स्थानी आहे.

बुमराहच्या क्रमवारीत सुधारणा

गोलंदाजांमध्ये भारताच्या जसप्रीत बुमराहच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ६ विकेट घेतल्यामुळे त्याने ३८ व्या स्थानावरून ३३ व्या स्थानी झेप घेतली आहे. आता त्याच्या खात्यात ५३८ गुण जमा आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नेथन लायनच्या क्रमवारीत २ स्थानांची सुधारणा झाली आहे. तो ७२५ गुणांसह १४ व्या स्थानी आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -