घरक्रीडाटी-२० विश्वचषक २०२१ चं यजमानपद काढून घेऊ; आयसीसीची बीसीसीआयला धमकी

टी-२० विश्वचषक २०२१ चं यजमानपद काढून घेऊ; आयसीसीची बीसीसीआयला धमकी

Subscribe

कराच्या वादावरुन आयसीसीने टी-२० विश्वचषक २०२१ चं यजमानपद काढून घेऊ, अशी धमकी बीसीसीआयला दिली आहे.

क्रिकेटचा सर्वात बलाढ्य आणि श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयला टी-२०, २०२१ विश्वचषकाचं यजमानपद हिसकावून घेण्याची धमकी आयसीसीने दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आयसीसीने बीसीसीआयकडे भारत सरकारकडून करात सूट मिळावी अशी मागणी केली होती. पण अध्यक्ष सौरव गांगुली तसं करू शकले नाहीत. आयसीसीने बीसीसीआयला १८ मे पर्यंत लेखी सूट देण्यास सांगितलं होतं. परंतु कोरोना विषाणूमुळे बीसीसीआय असं करण्यात अपयशी ठरला. बीसीसीआयने आयसीसीकडे ३० जूनपर्यंत मुदत मागितली आहे, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने स्पष्टपणे नकार दिली आहे.

कोरोना विषाणूमुळे यंदाचा आयसीसी टी-२० वर्ल्ड कप पुढे ढकलला जाणार आहे. रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी-२० वर्ल्ड कप आता २०२२ मध्ये होणार आहे. त्याचबरोबर पुढच्या वर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. परंतु कराच्या प्रश्नामुळे आयसीसी आणि बीसीसीआयमधलं वातावरण गरम आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जैव-सुरक्षित वातावरणात क्रिकेट खेळणे अशक्यच!


बीसीसीआयचा प्रतिसाद

आयसीसीच्या धमकीवर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की विश्व क्रिकेट संस्था असे पाऊल उचलून आत्महत्या करू इच्छित नाही. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पुढे म्हटलं आहे की त्यांचा आयसीसी संचालकांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते स्पर्धा भारताकडून यजमानपद घेऊन आत्मघाती निर्णय घेणार नाहीत. हा आयसीसीचा नव्हे तर काही लोकांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचा दावा बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने केला. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं की जर हे केलं गेलं तर बीसीसीआयचं नाही तर आयसीसीचं नुकसान होईल.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -