घरक्रीडातर विव्ह रिचर्ड्स, सेहवागचा वारसा रोहित पुढे चालवेल - सुनील गावस्कर

तर विव्ह रिचर्ड्स, सेहवागचा वारसा रोहित पुढे चालवेल – सुनील गावस्कर

Subscribe

रोहित शर्मा हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जातो.

रोहित शर्मा हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जातो. खासकरून एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने सातत्यपूर्ण प्रदर्शन केले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३ द्विशतके करणारा रोहित हा एकमेव फलंदाज आहे. मात्र रोहितला अजून कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन करण्यात अपयश आले आहे. पण जर रोहितने एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली तर तो महान विव्ह रिचर्ड्स आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यानंतरचा सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जाईल असे मत भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.

कसोटी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता 

रोहितविषयी गावस्कर म्हणाले, “सेहवागप्रमाणे रोहितलाही मोठी शतके मारायला आवडतात. त्याने एकदा १०० चा आकडा पार केला की त्याला कोणीही अडवू शकत नाही. सेहवागप्रमाणेच रोहितची फलंदाजी खूप नेत्रदीपक आहे. रोहितने एकदिवसीय आणि टी-२० मध्ये खूपच चांगले प्रदर्शन केले आहे. रोहितने जर मर्यादित षटकांप्रमाणेच कसोटी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली तर तो विव्ह रिचर्ड्स आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यानंतरचा सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जाईल.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -