घरक्रीडाकारकिर्दीच्या सुरुवातीला धोनीने खूप पाठिंबा दिला

कारकिर्दीच्या सुरुवातीला धोनीने खूप पाठिंबा दिला

Subscribe

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मला कारकिर्दीच्या सुरुवातीला जो पाठिंबा दर्शवला होता, तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता असे भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहली एका मुलाखतीत म्हणाला. धोनीवर मागील काही काळात त्याच्या संथ फलंदाजीमुळे बरीच टीका झाली आहे. मात्र, त्याच्यासारख्या खेळाडूवर इतकी टीका होणे हे योग्य नाही, असे कोहलीला वाटते.

धोनीसारख्या खेळाडूवर इतकी टीका होणे हे योग्य नाही. माझ्यासाठी निष्ठा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी जेव्हा पहिल्यांदा भारतीय संघात आलो, त्यावेळी कर्णधार असणारा धोनी दुसर्‍या एखाद्या खेळाडूला संधी देऊ शकला असता. मी मिळालेल्या संधीचे सोने केले, पण तरीही त्याचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. तसेच त्याने मला तिसर्‍या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली. कोणत्याही युवा खेळाडूला सहजासहजी तिसर्‍या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळत नाही, पण धोनीमुळे मला ती मिळाली, असे कोहलीने सांगितले.

- Advertisement -

धोनी अनुभवी खेळाडू असल्याने कर्णधार कोहलीला बर्‍याचदा सल्ला देताना दिसतो. धोनी संघात असल्याचा तुला किती फायदा होतो असे विचारले असता कोहली म्हणाला, धोनी हा एक असा खेळाडू आहे ज्याला कोणत्या परिस्थितीत काय केले पाहिजे हे चांगले माहित आहे. त्याला माहित आहे की ३०-३५ षटकांनंतर मी सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणार. मला तसे करायला आवडते. त्यामुळे तो आपोआपच यष्टींमागून क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मदत करतो. त्याच्यासारखा खेळाडू यष्टींमागे असणे हे माझे भाग्य आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -