घरक्रीडासिंधूची फायनलमध्ये धडक

सिंधूची फायनलमध्ये धडक

Subscribe

आज अंतिम सामना

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना आज (रविवारी) खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सिंधूने तिसर्‍या मानांकित चीनच्या चेन युफेनवर २१-१९, २१-१० अशी मात केली.

या विजयासह सिंधू अंतिम फेरीत पोहोचली आहे. पहिल्या गेममध्ये सिंधू आणि चेन युफेन यांच्यामध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. पहिल्या गेममध्ये फक्त दोन गुणांच्या फरकाने सिंधू जिंकली. पहिला गेम जिंकल्यावर मात्र, सिंधूचा आत्मविश्वास दुणावला. सिंधूने दुसर्‍या गेममध्ये चेन युफेनवर सहज मात करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.

- Advertisement -

सिंधूने डेन्मार्कच्या मिया बिलिचफेल्टविरुद्ध तीन गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत सरशी साधत गुरुवारी इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. पाचव्या मानांकित सिंधूने दुसर्‍या फेरीच्या लढतीत एक तास दोन मिनिटामध्ये बिलिचफेल्टविरुद्ध २१-१४, १७-२१, २१-११ ने सरशी साधली.

सिंधूची यानंतरची लढत मलेशियाच्या सोनिया चेह व जपानच्या नाओमी ओकुहारा यांच्यादरम्यानच्या लढतीत विजेत्या खेळाडूसोबत होईल. भारताचे सात्विकासाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीच्या जोडीला दुसर्‍या फेरीत इंडोनेशियाच्या अव्वल मानांकित मार्कस फर्नाल्डी गिडियोन व केव्हिन संजय सुकामुल्जो यांच्याविरुद्ध १५-२१, १४-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -