घरक्रीडाभारतीय महिलांचा विजयी चौकार

भारतीय महिलांचा विजयी चौकार

Subscribe

चौथ्या टी-२० सामन्यात विंडीजवर ५ धावांनी मात

गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने चौथ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिज महिला संघाचा ५ धावांनी पराभव केला. भारतीय महिलांचा या मालिकेतील सलग चौथा विजय होता. त्यामुळे त्यांनी ५ सामन्यांच्या या मालिकेत ४-० अशी आघाडी मिळवली आहे. या सामन्यात विंडीजचा पराभव झाला असला तरी त्यांच्याकडून ३ विकेट्स घेणार्‍या हेली मॅथ्यूजला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

सततच्या पावसामुळे हा सामना ९-९ षटकांचा करण्यात आला. विंडीजची कर्णधार अनिसा मोहम्मदने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. भारताला ९ षटकांत ७ विकेट गमावत ५० धावाच करता आल्या. भारताकडून केवळ पूजा वस्त्राकरला (१०) दुहेरी धावसंख्या करता आली. विंडीजच्या मॅथ्यूजने ३, तर अफी फ्लेचर आणि शेनेटा ग्रिमंडने २-२ बळी घेतले.

- Advertisement -

५१ धावांचा पाठलाग करणार्‍या विंडीजला ९ षटकांत ५ बाद ४५ धावाच करता आल्या. मॅथ्यूज (११), चिनेल्ले हेन्री (११) आणि नताशा मॅक्लेन (१०) यांनी विंडीजला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, विंडीजचा संघ ५ धावांनी पराभूत झाला. भारताकडून अनुजा पाटीलने २, तर दीप्ती शर्मा आणि राधा यादवने १-१ विकेट मिळवली.

संक्षिप्त धावफलक – भारत : ९ षटकांत ७ बाद ५० (पूजा वस्त्राकर १०; हेली मॅथ्यूज ३/१३, अफी फ्लेचर २/२) विजयी वि. वेस्ट इंडिज : ९ षटकांत ५ बाद ४५ (हेली मॅथ्यूज ११, चिनेल्ले हेन्री ११; अनुजा पाटील २/८).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -