घरक्रीडावार्षिक कराराच्या अ श्रेणीत समावेश

वार्षिक कराराच्या अ श्रेणीत समावेश

Subscribe

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०१८-१९ मोसमाकरता खेळाडूंसाठी वार्षिक करार यादी जाहीर केली आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही खेळाडूंची अ+, अ, ब आणि क अशा ४ श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. अ+ या सर्वोच्च श्रेणीमध्ये कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या तीन खेळाडूंना जागा देण्यात आली आहे. तसेच मागील वर्षी चांगली कामगिरी करणार्‍या युवा यष्टीरक्षक-फलंदाजला बढती मिळाली आहे. त्याचा अ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. अ+ श्रेणीतील खेळाडूंना ७ कोटी, अ श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी, ब श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी आणि क श्रेणीतील खेळाडूंना १ कोटी रुपये मिळणार आहेत.

मागील ४-५ महिन्यांत शिखर धवनला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. त्यामुळे त्याची अ+ श्रेणीतून अ श्रेणीत घसरण झाले आहे. या वार्षिक कराराचा कालावधी १ ऑक्टोबर २०१८ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचा आहे. मागील काही काळात दुखापतीने सतावलेल्या वृद्धिमान साहाचा क श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. मागील वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार्‍या पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल यांना मात्र कोणत्याही श्रेणीत स्थान मिळालेले नाही.

- Advertisement -

खेळाडूंची यादी –

अ+ श्रेणी : विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह

अ श्रेणी : रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, रिषभ पंत

- Advertisement -

ब श्रेणी : लोकेश राहुल, उमेश यादव, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या

क श्रेणी : केदार जाधव, दिनेश कार्तिक, अंबाती रायडू, मनिष पांडे, हनुमा विहारी, खलिल अहमद, वृद्धिमान साहा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -