घरक्रीडापर्थ कसोटीत भारताचा १४६ धावांनी पराभव

पर्थ कसोटीत भारताचा १४६ धावांनी पराभव

Subscribe

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये भारताचा पराभव झाला आहे. पर्थ कसोटीमध्ये भारताचा १४६ धावांनी पराभव झाल्यानं मालिकेत ऑस्ट्रेलियानं मालिकेत १ - १ अशी बरोबरी साधली आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये भारताचा पराभव झाला आहे. पर्थ कसोटीमध्ये भारताचा १४६ धावांनी पराभव झाल्यानं मालिकेत ऑस्ट्रेलियानं मालिकेत १ – १ अशी बरोबरी साधली आहे. भारताचा दुसरा डाव केवळ १४० धावांमध्ये आटोपला. २८७ धावांचा पाठलाग करताना भारताचा संघ अवघ्या १४० धावांमध्ये तंबुत परतला. आस्ट्रेलियानं दिलेल्या आव्हानांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराबच झाली. के. एल. राहुल शुन्यावर बाद झाला. त्यानंतर ठराविक अंतरान फलंदाज बाद होत गेलं. पहिल्या डावात १२३ धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेवर भारताची आशा कायम होती. पण, दोन्ही फलंदाजांनी देखील निराशा केली. शिवाय गोलंदाजांप्रमाणे फलंदाजांनी कामगिरी न केल्यानं अखेर भारताला पर्थ कसोटीमध्ये पराभव स्नीकारावा लागला आहे.

भारताची खराब सुरूवात 

भारताची दुसऱ्या डावाची सुरूवात खराब झाली. के. एल. राहुल शून्यावर, तर पुजारा ४ धावा करून तंबूत परतला. कोहली १७ धावा, मुरली विजय २०, आणि अजिंक्य रहाणे ३० या तिघांनी काही काळ संघर्ष देखील केला. त्यानंतर आज ऋिषभ पंत ३०, उमेश यादव ०२, इशांत शर्मा ० आणि बुमराह ० असे फलंदाज तासाभराच्या अंतरानं बाद होत गेले. ऑस्ट्रेलियाच्या माऱ्या पुढे भारतीय फलंदाजी काही तग धरू शकली नाही. अखेर पर्थ कसोटीमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -