IND vs AUS : पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाची अप्रतिम फिल्डिंग

पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने अप्रतिम फिल्डिंग केली.

Adelaide
उस्मान ख्वाजाचा अप्रतिम कॅच

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात झाली. या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने अप्रतिम फिल्डिंग केली. भारताचे सलामीवीर लोकेश राहुल आणि मुरली विजय लवकर बाद झाल्याने कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला. या मालिकेत विराट खूप धावा करेल अशी अपेक्षा आहे. मात्र त्याला पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात अवघ्या ३ धावा करता आल्या. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर त्याचा गलीमध्ये उस्मान ख्वाजाने अप्रतिम झेप पकडला. विराटने ऑफ स्टॅम्पबाहेरचा चेंडू मारला. तो चेंडू हवेत असताना उडी मारत गलीमध्ये उभ्या ख्वाजाने झेप घेतला.

या सामन्यात इतर फलंदाज लवकर बाद होत असताना चेतेश्वर पुजाराने अप्रतिम फलंदाजी करत शतकी खेळी केली. पण तो १२३ धावांवर असताना दिवसाच्या अखेरच्या षटकात १ धाव घेण्यासाठी धावला. पण त्याने मारलेला चेंडू पॅट कमिन्स उचलून त्याला धावचीत केले. कमिन्सने आपल्या उजव्या बाजूचा चेंडू घेण्यासाठी उडी मारत पुजाराला आउट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here