घरक्रीडाIND vs AUS : विराट काहीही चुकीचे बोलला नाही; बीसीसीआयचे स्पष्टीकरण

IND vs AUS : विराट काहीही चुकीचे बोलला नाही; बीसीसीआयचे स्पष्टीकरण

Subscribe

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन बऱ्याचदा वादावादी करताना दिसले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन हे दोघे बऱ्याचदा वादावादी करताना दिसले. या शाब्दिक चकमकींदरम्यान ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांच्या मते कोहली पेनला मी जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे आणि तू फक्त काही दिवसांसाठी कर्णधार आहेस असे बोलला. पण बीसीसीआयने या गोष्टीचे खंडन केले आहे. विराट पेनला काहीही चुकीचे बोलला नाही असे बीसीसीआयने म्हटले आहे. ‘आम्हाला विराट कोहली आणि टीम पेन यांच्यातील वादाबद्दल संघ व्यवस्थापनाने स्पष्टीकरण दिले आहे आणि आम्हाला कळले आहे की विराट चुकीचे काहीही बोलला नाही. आम्ही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीचे खंडन करतो. त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत.’

वाद फक्त मैदानातच राहणे गरजेचे

पेन बरोबरच्या वादाबद्दल विराट कोहलीनेही सामन्यानंतर स्पष्टीकरण दिले होते. तो म्हणाला, “जर तुम्ही शिवीगाळ करत नसाल, काहीतरी वयक्तिक बोलत नसाल तर सामन्यादरम्यान वादावादी करण्यास काहीही हरकत नाही. पण हा वाद फक्त मैदानातच राहणे गरजेचे आहे.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -