IND vs AUS : पहिल्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गुरुवारपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी भारताने १२ सदस्यीस संघ जाहीर केला आहे.

Adelaide
रोहित शर्मा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना अॅडलेड येथे होणार आहे. या कसोटीच्या एक दिवस आधीच भारताने संघ जाहीर केला आहे. या संघात रोहित शर्मा आणि हनुमा विहारी या दोघांचाही समावेश आहे. त्यामुळे भारतीय संघात सहाव्या क्रमांकावर कोण खेळणार या प्रश्नाचे अजूनही उत्तर मिळालेले नाही. तसेच भारताने या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संघात स्थान दिलेले नाही. त्यामुळे भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी हे तिघे सांभाळतील. तर रविचंद्रन अश्विन हा एकमेव स्पिनर संघात आहे.

जडेजा संघात नाही

भारतीय संघात सहाव्या क्रमांकावर रोहित शर्मा किंवा हनुमा विहारी या दोघांपैकी कोण खेळणार हा प्रश्न होता. हनुमा विहारीचा सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्याने क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन विरुद्धच्या सराव सामन्यातही अर्धशतक केले होते. त्यामुळे पहिल्या सामन्यात त्यालाच संघात स्थान मिळेल अशी चर्चा होती. पण रोहितचा १२ सदस्यीस संघात समावेश असल्याने अजूनही संघात कोण असणार हा प्रश्न कायम आहे. तर या संघात अष्टपैलू रवींद्र जडेजाचा समावेश नाही.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here