IND vs AUS : विराटचा जोरदार सराव

६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याआधी विराट कोहलीने नेट्समध्ये जोरदार सराव केला.

Adelaide
विराट कोहलीचा नेट्समध्ये जोरदार सराव (सौ-DNA)

भारत आणि  ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना हा अॅडलेड ओव्हल येथे होणार आहे. या मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे आणि त्यासाठी विराटही जोरदार तयारी करतो आहे. त्याने मंगळवारी नेट्समध्ये भरपूर सराव केला.


मागील दौऱ्यात अप्रतिम प्रदर्शन 

विराट कोहलीने मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अप्रतिम प्रदर्शन केले होते. त्याने ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ४ शतके केली होती. त्याने ४ कसोटी सामन्यांत ८ डावांत ८६.५० च्या सरासरीने ६९२ धावा केल्या होत्या. तर तो भारताचा एकमेव असा फलंदाज होता ज्याने द.आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यातही सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेतही त्याच्याकडून भारतीय संघाला खूप अपेक्षा आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here