घरक्रीडादुसऱ्या टी-२० मध्येही भारताचा न्यूझीलंडवर विजय! २-० ने आघाडी

दुसऱ्या टी-२० मध्येही भारताचा न्यूझीलंडवर विजय! २-० ने आघाडी

Subscribe

पहिल्या टी-२० सामन्यामध्ये न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवलेल्या टीम इंडियाने ऑकलंडमध्ये पार पडलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये देखील त्याच आत्मविश्वासाने न्यूझीलंडला पराभूत केलं. या विजयासोबत भारताने मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडला अवघ्या १३२ धावांवर रोखण्यात टीम इंडियाला यश मिळालं. विजयासाठी असलेल्या १३३ धावा भारताने ओव्हर्स शिल्लक ठेऊन पूर्ण केल्या. यामध्ये के. एल. राहुलने केलेल्या संयमी पण आश्वासक अर्धशतकाचा मोठा वाटा होता. आता या मालिकेतील तिसरा सामना हॅमिंग्टनमध्ये २९ जानेवारी रोजी होईल. ७ विकेट्सने भारतानं हा सामना खिशात घातला. विजयासाठी ४ धावा शिल्लक असताना शिवम दुबेने उत्तुंग षटकार खेचत विजयावर शिक्कामोर्तब केलं.

पहिली फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडच्या टीमने सलामीवीर मार्टिन गप्टिल (३३) आणि मुनरो(२६) यांच्या ४८ धावांच्या सलामीच्या जोरावर आश्वासक सुरुवात केली. मात्र, पुढे त्यांचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेले. विकेटकीपर सैफर्टने शेवटच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकांमध्ये १३२ धावांपर्यंत मजल मारली. यामध्ये रवींद्र जडेजाने २ तर शिवम दुबे, जसप्रीत बुमराह आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

- Advertisement -

खेळपट्टी गोलंदाजीला पूरक असल्यामुळे टीम इंडियाची सुरुवात खराब राहिली. सलामीवीर आणि भरवशाचा रोहित शर्मा अवध्या ८ धावांवर पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीने के. एल. राहुलसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी केली खरी. मात्र, विराट कोहलीची जादू आज चालू शकली नाही. ११ धावांवर टीम साऊदीने विराट कोहलीला माघारी धाडलं. यानंतर मात्र श्रेयस अय्यर (४४) आणि के. एल. राहुलने भारताच्या धावसंख्येला आकार दिला. ही जोडी भारताला विजय मिळवून देणार असं वाटत असतानाच संघाच्या १२५च्या धावसंख्येवर श्रेयस अय्यर टीम साऊदीला उंच फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. त्यानंतर विजयाची फक्त औपचारिकताच उरलेली असताना शिवम दुबेने उत्तुंग षटकार खेचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. के. एल. राहुल ५७ धावा बनवून शेवटपर्यंत नाबाद राहिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -