IND VS WI 2nd T-20 Live Updates : भारताने जिंकली मालिका

Lucknow
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा
 • भारताने या ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
 • विंडीजला फक्त १२४ धावाच करता आल्याने भारताने हा सामना ७१ धावांनी जिंकला. भारताकडून खलील, भुवनेश्वर, बुमराह आणि कुलदीप यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
 • किमो पॉल आणि कार्लोस ब्रेथवेट यांनी अखेरच्या षटकांत थोडीफार फटकेबाजी केली.
 • डॅरेन ब्रावो, निकोलस पुरन आणि पोलार्ड हे फलंदाजही झटपट माघारी परतले आहेत.
 • १९६ धावांचा पाठलाग करणाऱ्या विंडीजची अडखळती सुरुवात झाली आहे. खलील अहमदने शाई होप आणि शिमरॉन हेटमायर यांना लवकर बाद केले.
 • रोहितच्या शतकामुळे भारताने २० षटकांतमध्ये २ बाद १९५ धावा केल्या.
 • चांगल्या सुरुवातीनंतर भारताने झटपट २ विकेट गमावल्या आहेत, शिखर धवन ४३ तर रिषभ पंत ५ धावा करून बाद झाला.
 • भारताचा कर्णधार रोहित शर्माने ३८ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याच्या अर्धशतकात ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. 
 • भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी भारताच्या डावाची दमदार सुरुवात केली आहे. या दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली आहे. 
 • भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी डावाची सावध सुरुवात केली आहे.
 • भारतीय संघात वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन झाले आहे.
 • दुसऱ्या टी-२० सामन्यात विंडीजचा टॉस जिंकून फिल्डींगचा निर्णय घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here